सेलिब्रिटी एक्सपर्टकडून जाणून घ्या लग्नसराईत कसा असावा आहार, पचनक्रिया राहिल सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:20 PM2021-12-06T16:20:03+5:302021-12-06T16:20:40+5:30
लग्नाचा हा सिझन डोळ्यासमोर ठेवून सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी कोणत पदार्थ खा ते त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे.
सध्या लग्नकार्यांचा हंगाम सुरू झालाय. या काळात खूप तेलकट, अबरट-चरबट पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे पोट बिघडून पचनशक्तीवर परिणाम होतो. अशावेळी मग लोक काहीच खात नाहीत. त्यामुळे पुन्हा पोटावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नाचा हा सिझन डोळ्यासमोर ठेवून सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी कोणत पदार्थ खा ते त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे.
मेथीचा लाडू
गुळ, तूप, आणि सुंठ घालून मेथीचा लाडू तयार करा. तो खाल्ल्याने पोटात खूप दुखणे, बद्धकोष्ठता यापासून आराम मिळतो. तसेच आतड्यांसबंधी समस्या दूर होतात. केस चमकदार राहतात.
हे करा- एकतर नाश्त्याला किंवा संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान जेवताना, जर तुमची झोपेची वेळ किंवा व्यायामाची वेळ चुकत असेल तर, रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.
हिंग आणि काळं मीठ घालून ताक
ताक किंवा बटरमिल्क हे प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत. हिंग आणि काळे मीठ यांच्य़ा वापरामुळे पोटातील गॅस कमी होण्यास, आयबीएस टाळण्यास मदत होते.
हे करा- जर तुम्ही संध्याकाळी फंक्शनला जाणार असाल तर तुम्हाला सकाळी थोडे पोट रिकामे ठेवा.
झोपताना एक चमचा च्यवनप्राश
च्यवनप्राश रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते.फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्सचे हे स्त्रोत आहेत. लग्नाच्या गडबडीतही तुमची त्वचा लवचिक आणि मुलायम राहते.