Rujuta Diwekar यांचा खास सल्ला, वजन कमी करताना अजिबात करू नका 'या' चुका!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:14 AM2024-05-24T10:14:53+5:302024-05-24T10:16:44+5:30
Weight Loss Tips : सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी लोकांनी वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये याबाबत सांगितलं आहे.
Weight Loss: आजकाल जगभरातील लोक वाढलेल्या वजनामुळे हैराण आहेत. वजन वाढण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांमध्ये वजन वाढण्याचं कारण त्यांची चुकीची लाइफस्टाईल असते तर काही लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या आनुवांशिक असते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. काहींना यश मिळतं पण काहींना नाही. अशात काही चुका अपयशाला कारणीभूत ठरतात. सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी लोकांनी वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये याबाबत सांगितलं आहे.
कोणत्या चुका करतात लोक?
ऋजुता दिवेकर यांच्यानुसार,
१) जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यादरम्यान वजन कमी करणं हेच आपलं लक्ष्य बनवतात.
२) शरीराला वजन कमी करण्याची सवय व्हायला १२ आठवड्यांचा वेळ लागतो. अशात शरीर वजन कमी होण्याला किंवा शरीराला याची सवय लागायला अपयश समजतात.
३) ऋजुता सांगतात की, काही लोक एक्सरसाइजला शिक्षा समजू लागतात. एक्सरसाइजला शिक्षा समजणं तुमची मोठी चूक ठरू शकते.
४) वजन वाढतं म्हणून जेवण करण्याला गुन्ह्यासारखं बघणं ही एक मोठी चूक ठरू शकते.
५) बरेच लोक वजन कमी करण्यादरम्यान ते किती पावलं चालले, किती धावले, कॅलरी किती कमी झाल्या, किती दिवसात किती किलो वजन कमी झालं याच गोष्टींचा लेखाजोखा ठेवतात. असं अजिबात करू नये.
वजन कमी करण्याचा सोपा फंडा
- तुम्हाला जेवढी भूक लागते त्यामुळे खावे.
- एक्सरसाइज करणं टाळू नका.
- रोज वेळेवर आणि किमान ७ तास झोपावे.
- वजन वाढलं म्हणून जीवनाचा आनंद घेणं सोडू नका. आपल्या जवळच्या लोकांसोबत फिरा आणि एन्जॉय करा.