आजारपणात व्यायाम करावा की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 09:39 AM2018-09-19T09:39:00+5:302018-09-19T09:46:15+5:30

आजारी पडल्यावर अनेकजण व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण आजारी लोक हे केवळ शारीरिक नाही तर मानसिक रुपानेही आाजारी असतात.

Rules for exercising when you are sick | आजारपणात व्यायाम करावा की नाही?

आजारपणात व्यायाम करावा की नाही?

Next

(Image Credit : www.thisisinsider.com)

आजारी पडल्यावर अनेकजण व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण आजारी लोक हे केवळ शारीरिक नाही तर मानसिक रुपानेही आाजारी असतात. कमजोरीसोबतच त्या व्यक्तीचं कशातही लक्ष लागत नाही. हे तर सर्वजण ऐकून आहेत की, आजारी असताना व्यायाम करु नये. पण याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊ की, कोणत्या आजारात व्यायाम करावा किंवा करु नये.

ही लक्षणे असताना करु शकता व्यायाम

१) सायनसची समस्या असणे

२) शिंका येणे

३) सर्दी किंवा डोकेदुखी 

४) घशात खवखव

५) कानात दुखणं किंवा तणाव असेल

ही लक्षणे असेल तर करु नका व्यायाम

१) जास्त ताप असणे

२) मांसपेशींमध्ये वेदना

३) चक्कर येणे, छातीत वेदना

४) उलटी होणे

५) पोट बिघडले असणे

आजारी असताना व्यायाम करावा की नाही?

जर तुम्ही आजारी असाल तर रोज जितका व्यायाम करता तेवढा आजारी असताना करु नका. रोज रनिंग करत असाल तर आजारी असताना केवळ वॉक करा. जास्त ताकद किंवा मेहनत लागणारा व्यायाम न करता सोपा योगाभ्यास करावा. जर व्यायाम करताना तुम्हाला फार जास्त थकवा आला तर थोडा वेळ थांबून आराम करा आणि पुन्हा बरं वाटेल तेव्हा व्यायाम करा. 

जिमला जाऊ शकता?

जिममध्ये अनेकजण येत असल्याकारणाने विषाणु सहज परसतात. आजारी असताना व्यायामाचे वेगळे प्रकार घरीच करण्याचा प्रयत्न करा. जिममध्ये गेलात तर दुसऱ्यांना तुमच्यामुळे इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही उपक्रमाला घाण करु नका. यासाठी तुम्ही सॅनिटायझरता वापर करु शकता.

Web Title: Rules for exercising when you are sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.