दिलासादायक! अखेर 'या' देशात पुढच्या महिन्यापासून सर्वसामान्यांना दिली जाणार कोरोनाची लस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 11:34 AM2020-07-23T11:34:06+5:302020-07-23T11:35:58+5:30
एका रिपोर्टमध्ये ही लस पुढच्या महिन्यात सर्वसामान्यांना उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील लोक लसीची वाट पाहत आहेत. कोरोनाच्या लसीच्या शर्यतीत भारत ब्रिटेन, रुस, अमेरिका हे देश सगळयात पुढे आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस सध्या खुपच चर्चेत आहे. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लसीच्या चाचणीचे सकरात्मक परिणाम दिसून आले आहेत. रशियातील सेचोनेव युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आता या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला लवकरच सुरूवात होणार आहे. एका रिपोर्टमध्ये ही लस पुढच्या महिन्यात सर्वसामान्यांना उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुसने मागील काही दिवसात कोरोना व्हायरसची पहिली लस तयार करण्याचा दावा केला. चीन, ब्रिटन आणि अमेरीका हे देश लसीच्या शर्यतीत पुढे आहेत. पण रशियाच्या लसीबाबतच्या या दाव्याने सगळेचजण अवाक् झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने लसीसंबंधीत माहिती चोरल्याचा आरोपही लावण्यात आला होता. हा आरोप रशियाने नाकारला आहे. रशियाचे आरोग्यमंत्री यांनी अलिकडेच दिलेल्या माहितीनुसार रशियात कोरोना व्हायरसची लस ही लवकरच तयार होणार आहे.
स्पुत्निक न्यूज(Sputnik News) च्या रिपोर्टनुसार आरोग्य मंत्र्यानी सांगितले की अंतीम टप्प्यातील मानवी चाचणीआधीच कोरोना व्हायरसची ही लस सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली जाणार आहे. अतिरीक्त वैद्यकिय परिक्षणं याच कालावधीत केली जाणार आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव यांनी सांगितले की, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लसींवर संशोधन सुरू आहे. ऑगस्टमध्ये सुरू होत असलेल्या लसीच्या चाचणीसाठी हजारो वॉलेंटिअर्सना सहभागी करून घेतलं जाणार आहे.
३ ऑगस्टपासून लसीचे ट्रायल सुरू होणार आहे. रुस शिवाय सौदी अरेबियातही या लसीची चाचणी होणार आहे. साधारणपणे ३० मिलियन म्हणजेच ३ कोटी डोजचे उत्पादन केले जाण्याची शक्यता आहे. अन्य देशांसाठी मिळून १७ कोटी डोज तयार करण्याचा प्रयत्न असेल. मागील काही दिवसात रशियातील सेचेनोव युनिव्हर्सिटीने कोरोनाची लस सगळ्यात आधी विकसित केल्याचा जावा केला होता.
या लसीची निर्मीती रुसच्या डिफेंस मिनिस्ट्रीच्या गमाली इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीकडून करण्यात आलं आहे. न्यूज एजेंसी TASS च्या रिपोर्टनुसार सेचेनोव युनिव्हर्सिटीकडून लसीची तपासणी करण्यात आली. १८ जुनला लसीच्या पहिल्या चाचणीची सुरूवात झाली होती. यावेळी १८ स्वयंसेवकांना डोस देण्यात आले होते. त्यानंतर २३ जानेवारीला दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी २० लोकांच्या समुहाला लस देण्यात आली.
कोरोना विषाणूंच्या प्रसाराबाबत 'या' देशांतील संशोधकांचा धक्कादायक खुलासा; तज्ज्ञांनी सांगितलं की...
कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवाल; आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' १० सोपे उपाय