खुशखबर! लवकरच रशिया कोरोनाची दुसरी लस लॉन्च करणार; नोव्हेंबरपासून उत्पादनाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 04:45 PM2020-08-25T16:45:28+5:302020-08-25T16:59:26+5:30
CoronaVirus News & Latest Updates : EpiVacCorona नावाच्या या लसीला वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजीनं मिळून तयार केलं आहे.
जगभरातून सगळ्यात आधी कोरोनाची लस तयार केलेल्या रशियानं अजून एक लस तयार करण्याचा दावा केला आहे. रशियाची ही लस सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्पुतनिक वी लस दिल्यानंतर लोकांमध्ये वेगवेगळ्याप्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आले होते. पण नवीन लस कोरोनाला रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल असं सांगितले जात आहे. EpiVacCorona नावाच्या या लसीला वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजीनं मिळून तयार केलं आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या दुसऱ्या लसीत ज्या औषधांचा वापर करण्यात आला आहे. अशा औषधांचा सिक्रेट प्लॅन मागवण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये या लसीच्या चाचण्या पूर्ण होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या लसीची पहिली चाचणी ५७ स्वयंसेवकांवर करण्यात आली होती. वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजीनं मिळून ही लस तयार केली आहे. ही जगातील दोन प्रमुख संस्थांनांपैकी एक ही संस्था आहे. या कंपनीकडे कांजण्या या आजाराच्या लसीचाही मोठा स्टॉक आहे. या लसीसाठी सायबेरियाच्या सोवियत बायोलॉजिकल वेपंस रिसर्च प्लांटमधून औषधं मागवण्यात आली आहेत.
तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार ज्या रुग्णांवर लसीचे परिक्षण करण्यात आले. त्यांना २३ दिवस रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. रोगप्रतिकारकशक्ती पाहणं हे तज्ज्ञांचे उद्दीष्ट होतं. १४ ते २१ दिवसात स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये लसीच्या चाचण्या झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये रजिस्ट्रेशन केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. नोव्हेंबरमध्ये या लसीच्या उत्पादनाला सुरूवात होईल. आतापर्यंत या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत.
सोवियत बायोलॉजिकल वेपंस रिसर्च प्लांट आणि वेक्टर रिसर्च सेंटरनं मिळून आतापर्यंत कोरोनाच्या १३ लसींवर काम केले आहे. या लसींची प्राण्यांवर चाचणी झाली होती. वेक्टर रिसर्च सेंटरसोबत मिळून औदयोगिक स्तरावर कांजण्यांची लस तयार केली होती. मागिल काही वर्षात या संस्थानांनी मिळून ब्यूबोनिक प्लेग, इबोला, हेपेटाइटिस-बी, एचआईवी, सार्स तसंच कॅन्सरची एंटीडोज तयार केला आहे.
भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता
रशियाने तयार केलेली कोरोनावरील लस स्पूतनिक व्ही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेक भारतीय कंपन्या सरसावल्या आहेत. भारतीय कंपन्यांनी रशियन संचालक गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) यांच्यकडे लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांविषयी माहिती देण्यास सांगितले आहे.
आरडीआयएफ रशियाची भांडवल पुरवठा करणारी कंपनी आहे.
याच कंपनीने कोरोना लस स्पूतनिक व्हीचे संशोधन आणि चाचणीसाठी वित्तसहाय्य केले आहे. आरडीआयएफला ही लस वितरण व निर्यात करण्याचा अधिकार आहे. ही लस जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस आहे. जर आरडीआयएफसोबत भारतीय कंपन्यांची चर्चा सुरुच राहिली तर लस भारतात तयार होऊ शकते. ही लस निर्यात आणि देशात वापरली जाऊ शकते. मॉस्को येथील भारतीय दूतावासाच्या सूत्रांनी रशियन वृत्तसंस्था स्पूतनिकला ही माहिती दिली होती.
रशियन दूतावासातील सूत्रांनी सांगितले की, "भारतीय कंपन्या लस संदर्भात आरडीआयएफशी संपर्क साधत होते आणि या कंपन्यांनी फेज -१ आणि फेज -२ चाचणीसाठी तांत्रिक माहिती मागविली होती. या कालावधीत सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर तिसर्या देशाला लसीच्या निर्यातीवर चर्चा झाली. याशिवाय, देशातील वापरासाठी लस निर्मितीवरही चर्चा झाली होती."
रशिया कोरोनाविरूद्ध लस रजिस्टर करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ही लस रशियाच्या मायक्रो बायोलॉजी रिसर्च सेंटर गमलयाने विकसित केली आहे. ही लस बुधवारी क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात गेली आहे. रशियामध्ये भारताचे राजदूत वेंकटेश वर्मा यांनी वृत्तसंस्था स्पूतनिकला सांगितलं होतं की, लस निर्मितीसंदर्भात आरडीआयएफ प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच, यासंदर्भात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.
हे पण वाचा-
Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण