पॉझिटिव्ह बातमी! कोरोना व्हायरसपासून २ वर्षांपर्यंत सुरक्षा देणार 'ही' लस; वैज्ञानिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 12:58 PM2020-12-14T12:58:12+5:302020-12-14T13:13:17+5:30
CoronaVirus News & Latest Updates : रशियन वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, स्पुटनिक-व्ही ही लस कोरोना व्हायरसपासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा देऊ शकते.
रशियाने ऑगस्टमध्ये आपली लस स्पुटनिक व्ही लॉन्च केली होती. तेव्हापासून आतापर्यंत स्पुटनिक व्ही लस आतापर्यंत लाखो लोकांना दिली दिली असल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत कोणतीही कोरोनाची लस व्हायरसच्या संक्रमणापासून कितपत सुरक्षा देईल याबाबत दावा करण्यात आला नव्हता. नुकत्याच समोर आल्या माहितीनुसार रशियन वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, स्पुटनिक-व्ही ही लस कोरोना व्हायरसपासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा देऊ शकते.
गमलेया रिसर्च इंस्टीट्यूटचे डायरेक्टर अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दावा केला होता की, स्पुटनिक-व्ही या लसीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा प्रधान करता येऊ शकते. टीएएसएस वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, युट्यूबवरील व्हिडीओत सोव्हिएत वाहिनीवर अलेक्झांडर गिंट्सबर्ग म्हणाले, “सध्या मी फक्त सुचवू शकतो, कारण अधिक प्रयोगात्मक डेटा आवश्यक आहे. आमची लस इबोला लसीच्या आधारावर तयार केली गेली आहे.
आतापर्यंत या लसीशी संबंधित सर्व प्रयोगांच्या आकडेवारीवरून असे सूचित होते की ही लस दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ संरक्षण प्रदान करू शकते. अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांच्या मते, 'स्पुतनिक-व्ही' ९६ टक्के केसेसमध्ये प्रभावी आहे. अंतरिम संशोधनाच्या परिणांमानुसार स्पुतनिक व्ही लस ४२ दिवसांनंतर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी दिसून आली.
CoronaVirus : भारतात लसीशिवाय नष्ट होतेय कोरोनाची महामारी? तज्ज्ञांनी सांगितलं की.....
अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी ‘स्पुतनिक-व्ही’ लसीबाबत सावधगिरीचा इशाराही दिला आहे., ते म्हणतात की ''ही लस घेतल्यानंतर लोकांनी मद्यपान केले तर या लसीचा परिणाम कमी होऊ शकतो.'' अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांच्याव्यतिरिक्त उप पंतप्रधान ततियाना गोलिकोवा यांनीही लोकांना मद्यपान न करण्याचे आवाहन केले आहे. लस घेतल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले तर लसीचा काहीही उपयोग होणार नाही.
'या' ५ Genes च्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त
ब्रिटनमधल्या एडिंबरा विद्यापीठातल्या संशोधनातून एक चिंताजनक बाब समोर आली होती. पाच विशिष्ट प्रकारची जीन्स (Genes) असलेल्या व्यक्तींना कोरोनापासून सर्वांत जास्त धोका आहे, असा निष्कर्ष त्या संशोधनातून निघाला आहे. ‘डेली मेल’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हिंदी माध्यमांनी याबाबत माहिती दिली होती.
TYK2, CCR2, OAS1, IFNAR2 आणि DPP9 अशी या जीन्सची नावं आहेत. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी ब्रिटनमधल्या २०८ अतिदक्षता केंद्रामधल्या (ICU) २७०० कोरोना रुग्णांच्या डीएनएच्या माहितीचं विश्लेषण केलं. तसंच, या रुग्णांच्या माहितीची तुलना ब्रिटनमधल्या (Britain) आणखी एक लाख लोकांच्या माहितीसोबत केली गेली. तज्ज्ञांनी ज्या २७०० रुग्णांवर अभ्यास केला होता.
चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त
त्यातील २२ टक्के लोकांचा मृत्यू झाला असून ७४ टक्के लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला. अनेकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली. या संशोधकांनी ज्या २७०० रुग्णांचा अभ्यास केला, त्यापैकी २२ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७४ टक्के रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. काहींना व्हेंटिलेटरची गरज भासली होती.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, TYK2 आणि DPP9 ही जीन्स १९ क्रमांकाच्या गुणसूत्रावर आढळतात. IFNAR2 हे जीन २१ क्रमांकाच्या गुणसूत्रावर आढळतं, तर CCR2 जीन चौथ्या गुणसूत्रावर असतं. काही व्यक्तींना कोरोनाच्या संक्रमणामुळे गंभीर त्रास होतो तर काहींना कोरोनाची लागण झालेली असतानाही जास्त त्रास होत नाही. या मागचं कारण कळण्यासाठी अधिक परिक्षण केलं जाईल असं तज्ज्ञांनी सांगितले होते.