अखेर तिसऱ्या टप्प्यात पोहोचली रशियाची लस; 'या' देशाचे राष्ट्रपती सगळ्यात आधी लस घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:45 PM2020-08-18T13:45:07+5:302020-08-18T13:48:17+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाची लस स्पुटनिक ५ चे शेवटच्या टप्प्यातील मानवी परिक्षण पुढील ७ दिवसात सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Russian coronavirus vaccine sputnik v will go in third phase human trail mexico give support | अखेर तिसऱ्या टप्प्यात पोहोचली रशियाची लस; 'या' देशाचे राष्ट्रपती सगळ्यात आधी लस घेणार

अखेर तिसऱ्या टप्प्यात पोहोचली रशियाची लस; 'या' देशाचे राष्ट्रपती सगळ्यात आधी लस घेणार

googlenewsNext

रशियाची कोरोनाची लस WHO आणि अनेक देशांच्या संशयाच्या कचाट्यात सापडली आहे. अखेर कोरोनाची लस स्पुटनिक ५ चे शेवटच्या टप्प्यातील मानवी परिक्षण पुढील ७ दिवसात सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. या लसीत कोरोना विषाणूंना नष्ट करण्याची क्षमता आहे. असा विश्वास अनेक देशांना आहे. मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेज मेनवेल लोपेज ओबराडोर यांनी सांगितले की रशियाची कोरोनाची लस प्रभावी ठरल्यास या लसीनं लसीकरण करून घेण्यास ते तयार आहेत. याआधी फिलीपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो डुटेर्टेही लस  घेण्यास तयार आहेत. 

जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील तज्ज्ञांनी या लसीवर चिंता व्यक्त केली आहे. रशियन डायरेक्ट इवेस्टमेंट फंडाकडून ३८ सेकांदांचा व्हिडीओ प्रकाशित  करण्यात आला आहे. या व्हिडीओत स्पुतनिक ५ ही लस कशाप्रकारे कोरोनाचं संक्रमण नष्ट करते याबाबत माहिती देण्यात आली आहे. रशियाच्या तास वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार लसीचे शेवटच्या टप्प्यातील परिक्षण पुढील ७ दिवसांमध्ये सुरू होणार आहे. रशियाच्या मॉस्कोमध्ये होणाऱ्या परिक्षणात हजारो लोकांचा समावेश असणार आहे. 

या लसीच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी खूप  जलद गतीने झाली होती. जवळपास दोन महिन्यांच्या आत दोन्ही टप्प्यातील ट्रायल पूर्ण करण्यात आलं होतं. स्पूतनिक न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार लसीच्या उत्पादनाचा एक व्हिडीओ सुद्धा तयार करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती आणि गमालेया इंस्टिट्यूनं  ही लस प्रभावी ठरत असल्याचे सांगितले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस विकसित करण्यात आली आहे. 

लोपेज़ ओबराडार यांनी कोरोनाच्या लसीबाबत माहिती देताना सांगितले की, सगळ्यात आधी लसीकरण करण्यासाठी मी तयार असेन. जगभरात कोरोनाची लस तयार करण्यासाठी शर्यंत  सुरू आहे. अशा स्थितीत मॅक्सिको आणि अर्जेंटीनाच्या सरकारनं औषध निर्मीती करत असलेल्या एक्सट्राजेनका या कंपनीशी करार केला आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यास मॅक्सिकोला २० कोटी लसीचे डोजची आवश्यकता असल्याचे मेक्सिकोच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. मॅक्सिकोमध्ये आतापर्यंत ५१ लाख २१ हजार ६१ संक्रमित दिसून आले आहेत. सरकारी माहितीनुसार कोरोनामुळे देशात ५६ हजार ५७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

हे पण वाचा-

'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

Web Title: Russian coronavirus vaccine sputnik v will go in third phase human trail mexico give support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.