Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:23 PM2024-07-22T16:23:11+5:302024-07-22T16:23:47+5:30

Sadguru Diet Tips:फॅन्सी डाएट वजन घटवण्याचा दावे करतात, त्यामुळे उत्साहाच्या भरात आपण ते सुरु करतो पण त्यात सातत्य ठेवत नाही, म्हणून सद्गुरु सांगताहेत सोप्या टिप्स!

Sadguru Diet: Does it break within a few days after starting a diet? Follow Sadhguru's weight loss tips! | Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स!

Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स!

मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार या आजारांच्या बरोबरीने घरातघरात थैमान घालत असलेला आणखी एक आजार म्हणजे कर्करोग! पूर्वीच्या काळातही कर्करोगाचे रुग्ण हाते, परंतु त्यांच्या संख्या शंभरात दोन किंवा तीन इतकी असे. आता हे प्रमाण उलट होऊन शंभरात दोन ते तीन जण निरोगी आढळतात. एकाएक हे गुणोत्तर व्यस्त होण्याचे कारण आहे, बदलती जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती! 

उदाहरणार्थ, प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात. परंतु त्या विखरलेल्या असतात. त्या एकत्र आल्या की त्यांची टोळी मोठा घातपात करते. त्या एकट्या दुकट्याने असतात, तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु त्या एकत्र आल्यावर त्या घालवण्यासाठी आपण पाण्यासारखा पैसा घालतो. कर्करोगाच्या पेशी वाढतात, कारण त्यांना गरजेपेक्षा जास्त अन्न पुरवले जात आहे. आता तर परदेशातील शास्त्रज्ञही सांगत आहेत, की रोज अधून मधून उपास करा. दोन जेवणांमध्ये सोळा तासांचे अंतर ठेवा. परंतु हजारो वर्षांपासून आपल्याकडे हेच सांगितले जाते. मात्र, आपण ती आहारपद्धती न अनुसरता कधीही, कितीही, कसेही खाऊन रोगांना आमंत्रण देतो. 

सद्गुरुंच्या सांगण्यानुसार दिवसातून दोन वेळा जेवण पुरेसे आहे. तेही सकाळी १० आणि सायंकाळी ६ वाजता. दिवसभरातून एकदाच जेवलात, तर तेवढेही जेवण पुरेसे आहे. ऊर्जानिमित्ती हा अन्नसेवाचा हेतू आहे. परंतु, जेवणानंतर तुम्हाला झोप येत असेल, तर ते अन्न तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

भूकेने कळवळणे आणि उपाशी राहणे, या दोन भिन्न स्थिती आहेत. भूकेने कळवळणारी व्यक्ती रागराग, चिडचिड करते. तर आपणहून उपाशी राहणारी व्यक्ती शरीर हलके झाल्याचे अनुभवते. शरीर हलके ठेवले, तर कामात लक्ष लागते. कामात गुंतून राहिल्यामुळे वारंवार खाण्याची सवय मोडते. जेवायच्या वेळी जेवण हे कर्तव्यासारखे पार न पाडता, भूक लागली की जेवणे इष्ट ठरते. अतिरिक्त जेवण अनावश्यक पेशींना खतपाणी घालते. उपाशी पोटी झोप लागत नाही, ही चुकीची मानसिकता आहे. आपणच हे मनाशी ठरवून टाकले आहे, की झोप लागणार नाही. न जेवताही दुपारी थोडा वेळ वामकुक्षी घेता आली पाहिजे. 

आहारपद्धतीत आणखी एक चांगली सवय म्हणजे जेवणाआधी अन्नाला स्पर्श करा. अन्न कसे आहे, ते जाणून घ्या. कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणते नाही, हे तुम्हाला स्पर्शाने जाणवले पाहिजे. जे पदार्थ नको, ते उष्टे करण्याआधीच परत करा. अन्नाची नासाडी करू नका. शक्यतो हाताने जेवा. कारण हाताच्या स्वच्छतेची काळजी तुम्ही घेऊ शकता. चमचे स्वच्छ असतील, याची खात्री नाही. 

ग्रहण करत असलेल्या अन्नाकडे कृतज्ञतेने पाहिले पाहिजे. अन्न केवळ पदार्थ नाही, तर तुमचे जीवन आहे. अनेकांना ते मिळत नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. जाणीवेचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. सवय म्हणजे जागरुकपणे काम करण़े  मनुष्य म्हणून जगण्याची सुंदरता यात आहे, की आपण प्रत्येक काम जागरुकतेपणे करू लागतो. जे लोक जागरुकतेने काम करतात त्यांचे तेज दिसून येते. 

अन्नाबद्दल सूज्ञपणा कमी होत चालला आहे. केवळ जीभेला बरे वाटत आहे म्हणून न खाता शरीराला आवश्यक घटक कसे मिळतील, याचा बारकाईने विचार केला पहिजे. आपल्या आहारशैलीवर आपली दैनंदिन झोप अवलंबून असते. चांगल्या झोपेसाठी योग्य आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. मग कर्करोगच काय, अन्य कोणतेही रोग जवळही फिरकणार नाहीत.

Web Title: Sadguru Diet: Does it break within a few days after starting a diet? Follow Sadhguru's weight loss tips!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.