साखर की मीठ, हृदयासाठी सगळ्यात जास्त घातक काय? जाणून घ्या वैज्ञानिकांचं मत....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 02:03 PM2023-06-01T14:03:15+5:302023-06-01T14:03:41+5:30
Heart Disease : आजकाल लोक मीठ आणि साखरेचं सेवन वेगवेगळ्या माध्यमातून अधिक करतात. या दोन्ही पांढऱ्या गोष्टींमुळे आरोग्य धोक्यात येतं.
Heart Disease : हृदय निरोगी ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही खाता या थेट प्रभाव हृदयाच्या आरोग्यावर पडतो. आजकाल लोक मसालेदार, चटपटीत आणि गोड पदार्थांच सेवन अधिक करतात. पण मुळात या पदार्थांमुळे हृदयासंबंधी समस्यांचा धोका वाढतो.
आजकाल लोक मीठ आणि साखरेचं सेवन वेगवेगळ्या माध्यमातून अधिक करतात. या दोन्ही पांढऱ्या गोष्टींमुळे आरोग्य धोक्यात येतं. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मीठ आणि साखरेच्या पदार्थांमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. चला जाणून घेऊ याबाबत...
साखर हृदयासाठी घातक का?
जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रूट ज्यूस, कुकीज़, कॅंडी, केकमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. यांच्या अधिक सेवनाने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. Harvard हेल्थच्या रिपोर्टनुसार, भलेही साखर थेट तुमच्या हृदयाला प्रभावित करत नसेल, पण याने अनेक समस्या वाढून हृदय प्रभावित होतं. साखर फॅटमध्ये रूपांतरित होते ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा वाढून तुम्हाला हृदयरोगाची समस्या होऊ शकते.
साखरेने लठ्ठपणा आणि बीपीचा धोका
साखरेच्या अधिक सेवनाने लठ्ठपणाचा धोका अधिक असतो. कारण साखर नंतर फॅटमध्ये रूपांतरित होते. एक्स्ट्रा शुगरमुळे जुनी सूज आणखी वाढते आणि तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ हृदयरोगाचा धोका राहतो.
मीठ हृदयासाठी नुकसानकारक कसं?
सोडिअमचं जास्त प्रमाण केवळ हृदयासाठीच नाही तर शरीराच्या इतर अवयवांसाठीही नुकसानकारक आहे. रोज 5 ग्रामपेक्षा कमी सोडिअमचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ब्रेड, पिज्जा, सॅंडविच, मांस, सूप, स्नॅक्स, पोल्ट्री, पनीर आणि आमलेट सारख्या पदार्थांमध्ये यांचं प्रमाण अधिक असतं. NCBI वर प्रकाशित एका रिसर्चनुसार, सोडिअमच्या अधिक सेवनाने रक्तात पाण्याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं.
जास्त काय धोकादायक?
साखरेमुळे लठ्ठपणा वाढतो आणि डायबिटीसचा धोकाही वाढतो. तसेच साखरेने एथेरोस्क्लेरोसिसही वाढू शकतो. हे सगळे हृदयारोगाशी संबंधित आहेत. दुसरीकडे सोडिअममुळे ब्लड प्रेशर वाढतं, ज्यामुळे तुम्हाला हृदरोगाचा धोका असतो. तुम्ही जास्त साखर खा किंवा जास्त मीठ हृदयरोगाचा धोका सारखाच आहे.