सोयाबीनचे असेही आरोग्यदायी फायदे; जे तुम्हाला माहितीच नसतील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:39 PM2021-06-02T17:39:14+5:302021-06-02T17:40:05+5:30
आपल्या शरीरासाठी अत्यंत जरुरीचे असतात ते प्रोटीन. सोयाबीन हा असा पदार्थ आहे ज्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी,ई,मिनरल्स आणि अॅमीनो अॅसिड्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात
आपल्या शरीरासाठी अत्यंत जरुरीचे असतात ते प्रोटीन. सोयाबीन हा असा पदार्थ आहे ज्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी,ई,मिनरल्स आणि अॅमीनो अॅसिड्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे सोयाबीनचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे. डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्युजच्या संकेतस्थळाला सोयाबीनच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत. ते काय आहेत? वाचा पुढे...
कॅन्सर पासून बचाव
सोयाबीन हे कॅन्सरपासून आपला बचाव करते. ते शरीरातील कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखते. यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते कॅन्सरपासून आपला बचाव करतात.
हाडं मजबूत करतात
सोयाबीनच्या सेवनामुळे हाडं मजबूत होतात. सोयाबीनमध्ये कॅल्शियम, मॅग्नॅशियम, कॉपर व झिंकही असते. यामुळे शरीरातील हाडं मजबूत होतात.
डायबेटीस दूर ठेवतात
सोयाबीनच्या सेवनामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना बराच फायदा होतो. यातील प्रोटीन ग्लुकोज म्हणजे रक्तातील शर्करेला नियंत्रित ठेवते. तसेच यामुळे इन्शुलिनची समस्याही दूर होते.
मानसिक संतुलन राखते
तुम्हाला कोणताही मानसिक आजार असेल तर त्यामध्ये सोयाबीन महत्त्वाची भूमिका बजावते. सोयाबीनच्या सेवनाने मानसिक ताण तणाव दूर होतात.