सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 01:11 PM2019-01-16T13:11:12+5:302019-01-16T13:15:02+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या मनमोहक अदांनी अनेक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सारा अली खानच्याच चर्चा रंगलेल्या दिसतात. स्टार किड असलल्या साराने काही दिवसांपूर्वीच केदारनाथ आणि सिम्बा सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयचा गोडवा चाहत्यांना दिलाच.

Sara ali khan eats the same meal everyday does it help in weight loss | सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा

सारखं सारखं नव्हे; दर दिवशी सारखंच जेवा; सारा अली खानचा वेट लॉस फंडा

googlenewsNext

सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या मनमोहक अदांनी अनेक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सारा अली खानच्याच चर्चा रंगलेल्या दिसतात. स्टार किड असलल्या साराने काही दिवसांपूर्वीच केदारनाथ आणि सिम्बा सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयचा गोडवा चाहत्यांना दिलाच. पण त्याहीपेक्षा सारा आपला फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असते. पण साराने या ग्लॅमरस लूकसाठी फार मेहनत घेतली आहे. पीसीओएस या आजाराने ग्रस्त असलेल्या सारा अली खानचं वजन जवळपास 96 किलो होतं. परंतु बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी साराने अत्यंत मेहनत घेऊन आपलं फिटनेस मेन्टेन ठेवलं आहे. सध्या सारा बॉलिूडमधील नवीन जनरेशनची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 

प्रत्येक दिवशी चिकन आणि अंडी खाते सारा 

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता त्यामध्ये सारा अली खानला तिच्या फिटनेस सीक्रेट्सबाबत विचारण्यात आलं होतं. तसेच साराकडून हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सारा नक्की काय करते. यावर बोलताना साराने सांगितले की, सध्या ती जे डाएट फॉलो करत आहे, त्यामध्ये तिला चिकन आणि अंडी दिवसातून तीन वेळा खाणं गरजेचं असतं. प्रसिद्ध ब्रिटिश सिंगर आणि फॅशन डिझायनर विक्टोरिया बेकहमसुद्धा हेच डाएट फॉलो करतात. 

कीटो डायटचा सारा काहीच फायदा झाला नाही

सारा सांगते की, तिने कीटो डाएटही ट्राय केलं होतं. परंतु तिला त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. त्यामुळे तिने कीटो डाएट फॉलो करणं बंद केलं. आता तुम्ही विचारात पडला असाल की, सारखचं डाएट फॉलो केल्याने खरचं वेट लॉस होतं का? याचं उत्तर आहे हो. पण त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागते. उत्तम रिझल्टसाठी तुम्ही बॅलेन्स डाएट फॉलो केलं पाहिजे आणि एक स्ट्रिक्ट एक्सरसाइज डाएट फॉलो करा. परंतु तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं. ते म्हणजे, दरदिवशी एकच पदार्थ खाण्याची स्ट्रॅटर्जी. 

प्रत्येक दिवशी एकच पदार्थ खाण्याची वेट लॉस स्ट्रॅटर्जी

प्रत्येक दिवशी साराप्रमाणे चिकन आणि अंडी खाणं, ओटमील किंवा वरण-भात खाणं. याप्रकारच्या डाएट प्लॅनची आइडिया फक्त हिच आहे की, तुम्ही प्रत्येक दिवशी तोपर्यंत एकच पदार्थ खावा जोपर्यंत वजन कमी होण्यास सुरुवात होत नाही. एक्सपर्ट्सनुसार, प्रत्येक दिवशी दिवसातून तीन वेळा एकच पदार्थ तोपर्यंत खायचा जोपर्यंत तुम्हाला त्या पदार्थाचा कंटाळा येत नाही. अशातच तुम्ही जर डाएटिंग करत असाल तर हे तुमच्यासाठी एक उत्तम टॅक्टिक्स आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कंटाळता त्यावेळी तुमचा आहार आपोआप कमी होतो आणि भूकही कमी लागते. 

या गोष्टी लक्षात ठेवा :

- या डाएटमुळे कॅलरीज घटतात. परंतु शरीरातील मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम दिसून येतो. 

- जेव्हा तुम्ही एकच पदार्थ सतत खाऊन कंटाळता. तेव्हा तुम्हाला खाण्याचाच कंटाळा येतो आणि अनोरेक्सियाचा धोका वाढतो. 

- या डाएट प्लॅनमुळे तुम्ही कमी वेळात जास्त वजन कमी करू शकता परंतु हे जास्त वेळासाठी फॉलो नाही करू शकतं. 

Web Title: Sara ali khan eats the same meal everyday does it help in weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.