धक्कादायक! चीनमध्ये २०१९ च्या उन्हाळ्यातच झाला होता कोरोनाचा प्रसार, संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:17 AM2020-06-09T11:17:42+5:302020-06-09T11:29:00+5:30

CoronaVirus Latest News : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यातच चीनमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता. साधारणपणे जुन ते ऑगस्ट या कालावधीत चीनमध्ये तापमान जास्त असते. 

Satellite traffic data coronavirus hit china summer tsta | धक्कादायक! चीनमध्ये २०१९ च्या उन्हाळ्यातच झाला होता कोरोनाचा प्रसार, संशोधनातून खुलासा

धक्कादायक! चीनमध्ये २०१९ च्या उन्हाळ्यातच झाला होता कोरोनाचा प्रसार, संशोधनातून खुलासा

Next

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे.  संशोधनातून कोरोना विषाणूंबाबत वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होत आहे.  चीनमधील वुहान शहरातून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूंबाबत तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा  केला आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यातच चीनमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता. साधारणपणे जुन ते ऑगस्ट या कालावधीत चीनमध्ये तापमान जास्त असते. 

यामागे प्रमुख दोन कारणं आहेत. सॅटेलाईटद्वारे मिळालेल्या माहितीतून निदर्शनास आले की, वुहानच्या पाच प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण २०१९ च्या उन्हाळ्यात वाढले होते. दुसरं कारणं असं की इंटरनेटवरही अनेक लोक कोरोना आणि कोरोनाच्या लक्षणांबाबत सर्च करत असल्याचे दिसून आले. उदा, कफ, डायरिया. या दोन्ही घटना एकाचवेळी घडत होत्या.हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉ. जॉन ब्राउनस्टीन यांच्या नेतृत्वाखाली सॅटेलाईटद्वारे डेटाची जमवाजमव सुरू होती.  संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार वुहानच्या प्रमुख रुग्णालयात उन्हाळ्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. 

या अभ्यासात दिसून आले की, २०१८ ते २०१९ मध्ये वुहानच्या अनेक रुग्णांलयातील गर्दीचं प्रमाण ९० टक्क्यांनी वाढले होते. संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार या कालावधीत नक्कीच चीनच्या वुहान शहरात लोकांच्या आरोग्याबाबत काहीतरी घडत होतं.

ABC News च्या रिपोर्टनुसार जॉन ब्राउनस्टीन यांनी सांगितले की,  रुग्णालयातील  रुग्णांची वाढती संख्या आणि इंटरनेटवर कोरोनाशी जोडलेल्या गोष्टींबाबत सर्वाधिक सर्च या गोष्टी एकाच कालावधीत दिसून आल्या आहेत. 

अनेक देशांनी चीनवर हा आरोप लावला आहे की, कोरोनाबाबतची माहिती लपवण्यात आली होती. चीनने ३१ डिसेंबरला WHO ला कोरोनाच्या माहामारीबाबत माहिती  दिली. अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये नोव्हेंबरपासूनच कोरोनाचे रुग्ण दिसायला सुरूवात झाली होती. 
जॉन ब्राऊनस्टीनने सांगितले की, १० ऑक्टोबर २०१९ मध्ये वुहानच्या तिआनयोऊ रुग्णालयाजवळ जवळ २८५ कार पार्क केल्या होत्या. तर काही रुग्णांलयांमध्ये हा आकडा ९० टक्क्यांनी जास्त होता. 

समाधानकारक! कोरोना विषाणू 'या' तीन औषधांच्या मिश्रणाने होणार नष्ट; भारतातील तज्ज्ञांचा दावा

आता माऊथ वॉशच्या वापराने टाळता येणार कोरोनाचा संसर्ग; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत.
 

Web Title: Satellite traffic data coronavirus hit china summer tsta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.