Thank You! या दोन शब्दात दडलंय चांगल्या आरोग्याचं गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 03:59 PM2018-12-28T15:59:20+5:302018-12-28T16:00:07+5:30
आनंदी राहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या आनंदी राहण्यात आपल्या सोशल लाइफचं मोठं योगदान असतं.
(Image Credit : charity.lovetoknow.com)
आनंदी राहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या आनंदी राहण्यात आपल्या सोशल लाइफचं मोठं योगदान असतं. याबाबतचा खुलासा एका रिसर्चमध्ये करण्यात आलाय. तसेच यात सांगण्यात आलं आहे की, Thank You हे दोन असे कमालीचे शब्द आहेत. ज्यांच्यामुळे व्यक्तीमधील समाधानाचा स्तर तर वाढतोच. सोबतच त्या व्यक्तीला चांगंलं आरोग्य आणि चांगली झोपही येते.
या रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, एखाद्याप्रति आभार व्यक्त केल्याने दुसऱ्या व्यक्तीला आनंद तर मिळतोच सोबतत आभार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीलाही प्रसन्न वाटतं. गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या रिसर्चमधून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जी व्यक्ती दुसऱ्याप्रति आभार प्रकट करते, त्या व्यक्तीला मानसिक रुपाने खूप समाधान मिळतं.
इतकंच नाही तर या लोकांना डॉक्टरांकडे पुन्हा पुन्हा जाण्याची गरज पडत नाही. ते त्यांच्या जीवनात फार समाधानी असतात. दुसऱ्यांना Thank You किंवा धन्यवाद म्हणणारे लोक इतर लोकांच्या तुलनेत चांगली झोप घेऊ शकतात. याआधीही असे रिसर्च करण्यात आले होते. पण त्यात आभार व्यक्त करण्याच्या मुद्द्यावर जास्त भर दिला गेला नव्हता. यावेळी या अभ्यासात आभार व्यक्त करण्यावर जास्त जोर देण्यात आला आहे.
इटलीच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या २०० नर्सेसवर हा अभ्यास करण्यात आला. यातून असं आढळलं की, रुग्णांनी नर्सेसना धन्यवाद म्हटल्यावर नर्सेसनी रुग्णांसाठी अधिक जोशने काम करण्यास सुरुवात केली होती. तर दुसरीकडे रुग्णांच्या स्थितीतही वेगाने सुधारना झाली होती. दुसऱ्याप्रति आभार व्यक्त करणे ही फार सामान्य बाब आहे. पण अनेकदा आभार व्यक्त करण्यात काही लोक मागेपुढे पाहतात. या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, धन्यवाद म्हटल्यावर व्यक्तीमध्ये आनंद देणाऱ्या हार्मोन्सची संख्या वाढते. हे हार्मोन्स व्यक्तीला खूश ठेवण्यासोबतच चांगली झोप येण्यासही कारणीभूत असतात.