मोठा दिलासा! पुढच्या वर्षी जनजीवन सामान्य होणार; फायजरची लस बनवणाऱ्या तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 11:35 AM2020-11-16T11:35:36+5:302020-11-16T11:44:39+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या वाढत्या प्रसारात तज्ज्ञांनी केलेल्या या दाव्यामुळे आशेचा किरण दिसून आला आहे.

Scientist behind pfizer covid-19 vaccine says normal life will return | मोठा दिलासा! पुढच्या वर्षी जनजीवन सामान्य होणार; फायजरची लस बनवणाऱ्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! पुढच्या वर्षी जनजीवन सामान्य होणार; फायजरची लस बनवणाऱ्या तज्ज्ञांचा दावा

Next

फायजर कंपनीची  कोरोना लस तयार करत असलेल्या तज्ज्ञांनी एक सकारात्मक दावा केला आहे.  कोरोनाच्या वाढत्या प्रसारात तज्ज्ञांनी केलेल्या या दाव्यामुळे आशेचा किरण दिसून आला आहे. फायजर कंपनीची लस तयार करत असलेल्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी  सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली जाणार आहे. बायोएनटेकने फायजर कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. 

बायोएनटेकच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही महिने कठीण असू शकतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका वैद्यकिय परिक्षणादरम्यान  ही लस ९० टक्के परिणामकारक ठरली. पण याचा परिणाम सद्य स्थितीतील कोरोनाच्या लाटेवर दिसून येणार नाही. मागच्या आठवड्यात फायजर कंपनीने लस सुरक्षित ठरल्याची घोषणा केली. पण  अजूनही लसीची संबंधी अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. यातून लस सुरक्षित ठरत असल्याचे दिसून येईल.

बायोएनटेक कंपनीचे सीईओ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, जर सर्व काही व्यवस्थित असेल तर या वर्षाच्या शेवटापर्यंत लसीचे वितरण सुरू करता येऊ शकतं. पुढच्या वर्षी  एप्रिलपर्यंत ३० कोटी डोसचे वितरण करणं हे कंपनीचे उद्दिष्ट असणार आहे. ऊर साहीन यांनी असेही सांगितले की, फायजर बायोएनटेकच्या लसीचे काही प्रमाणात सौम्य साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. इंजेक्शन दिल्यानंतर काही ठिकाणी वेदना होत असून काही लोकांमध्ये सौम्य लक्षणं दिसून आली आहेत.

Vaccine

फायजरच्या लसीची किंमत

तज्ज्ञांच्या मते फायझरची लस ही कोरोनाविरोधात यश मिळवणारी पहिली लस ठरेल. फायझरने आपल्या या लसीची किंमत ही ३९. डॉलर ( प्रत्येक डोसासाठी १९.५ रुपये) एवढी ठेवली आहे. तर mRNA लसीवर काम करत असलेल्या मॉडर्नाने लसीची किंमत ही ३७ डॉलर एवढी ठेवली आहे. आता या लसीची भारतात किती किंमत असेल याची माहिती घेण्यात येत आहे.

मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

युरोपिय महासंघ, जपान, अमेरिका आणि ब्रिटन यांनी फायझरसोबत कोरोनावरील लसीसाठी करार केला आहे. या करारांतर्गत त्यांना २०२१ पर्यंत १.३ बिलीयन लसी मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय लस निर्मात्या कंपन्या आणि सरकारने फायझरसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. तसेच डब्ल्यूएचओची लस विकसित करत असलेल्या COVAX  सोबतही कुठलाही करार करण्यात आलेला नाही. खरेदीपेक्षा फायझरच्या अल्ट्रा कोल्ड व्हॅक्सिनसाठी सर्वात मोठं आव्हान साठवण असेल. फायझरच्या mRNA लसीला उणे ७० ते उणे ८० डिग्री तापमानामध्ये वाहतूक करून नेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण फ्रीजमध्ये ही लस २४ ते ४८ तासांत खराब होऊ शकते.

मोठा दिलासा! भारतातील बहुतेक लोकांना कोरोना लसीची गरज भासणार नाही?; एम्सच्या डॉक्टरांचा दावा

फायझरची लस ही भारतातील उष्ण वातावरणात फारशी उपयुक्त असेल असं वाटत नाही. अशा परिस्थितीत विकसित देशांना अल्ट्रा कोल्ड चेनच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असेल. सध्या भारताकडे सुमारे २७ हजार कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. हे २ ते आठ डिग्रीपर्यंत प्रशितन पुरवतात. काही कोल्ड चेन इफ्रास्ट्रक्चर विशिष्ट्य औषधांसाठी उणे ३० डिग्रीपर्यंत काम करतात. एकूण कोल्ड चेन इफ्रापैकी ९० टक्के कृषीमाल साठवण आणि केवळ १० टक्के औषधांच्या आवश्यकतेसाठी वापरले जाते.

Web Title: Scientist behind pfizer covid-19 vaccine says normal life will return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.