गुड न्युज! शास्त्रज्ञांनी तयार केली आर्टिफिशियल किडनी, डायलिसिसचा उपचार सोपे होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:38 PM2022-01-17T17:38:46+5:302022-01-17T17:54:18+5:30

किडनीच्या आजारांवर उपचार करण्यात शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. बायो आर्टिफिशियल किडनी बनवण्यात संशोधकांच्या एका टीमला यश आलंय.

scientist found artificial kidney | गुड न्युज! शास्त्रज्ञांनी तयार केली आर्टिफिशियल किडनी, डायलिसिसचा उपचार सोपे होणार

गुड न्युज! शास्त्रज्ञांनी तयार केली आर्टिफिशियल किडनी, डायलिसिसचा उपचार सोपे होणार

Next

किडनी प्रत्यारोपण आणि डायलेसिससाठी रुग्णांना या उपचारांसाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. दरम्यान, किडनीच्या आजारांवर उपचार करण्यात शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. बायो आर्टिफिशियल किडनी बनवण्यात संशोधकांच्या एका टीमला यश आलंय. किडनी प्रोजेक्टचं हे पहिलंच डिमॉन्स्ट्रेशन आहे. कृत्रिम किडनीचा आकार स्मार्टफोनच्या आकाराइतका असतो. कृत्रिम किडनीमध्ये दोन आवश्यक भाग आहेत. हेमोफिल्टर आणि बायोरिएक्टर एकत्र करून प्रीक्लिनिकल इवॉल्युएशनसाठी यशस्वीरित्या इम्पलीमेंट करण्यात आलं आहे.

शास्त्रज्ञांनी यापूर्वी हिमोफिल्टरची वेगळी चाचणी केली होती. हिमोफिल्टरचा वापर रक्तातील नको असलेल्या गोष्टी आणि टॉक्सिन पदार्थ काढून टाकण्यासाठी केला जातो. बायोरिएक्टरचीही अनेक पातळ्यांवर चाचणी करण्यात आल्या. बायोरिएक्टरचा वापर किडनीशी संबंधित इतर कार्यांसाठी केला जातो.

कृत्रिम किडनीला काम करण्यासाठी ब्लड प्रेशरचा दाब पुरेसा आहे. यासाठी रक्त पातळ करणाऱ्या औषधांची किंवा इतर प्रकारच्या कोणत्याच औषधांची गरज नाही. कृत्रिम किडनी अधिक योग्य पद्धतीने कार्य करू शकते आणि डायलिसिसपेक्षा चांगले परिणाम देते. कृत्रिम किडनी डायलिसिसपेक्षा कमी वेळ लागतो आणि त्यासाठी वारंवार क्लिनिकला जाण्याची आवश्यकता नाही.

Web Title: scientist found artificial kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.