आजारांना मुळापासून नष्ट करणारं फोन कव्हर, जाणून घ्या काय आहे याची खासियत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:13 AM2020-01-28T10:13:15+5:302020-01-28T10:15:21+5:30

हा पदार्थ रोजच्या वापरातील उत्पादने, हॉस्पिटल, दरवाज्याचे हॅंडल, खेळणी आणि इतरही काही ठिकाणांवर केला जाऊ शकतो. हा पदार्थ बॅक्टेरिया पसरण्यापासून रोखतो.

Scientist make antibacteria phone cover for disease | आजारांना मुळापासून नष्ट करणारं फोन कव्हर, जाणून घ्या काय आहे याची खासियत?

आजारांना मुळापासून नष्ट करणारं फोन कव्हर, जाणून घ्या काय आहे याची खासियत?

Next

(Image Credit : bustle.com)

सध्याच्या लाइफस्टाईलमध्ये लोक वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांच्या जाळ्यात अडकत आहेत. अशात यावर उपाय म्हणून एक असा अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल पदार्थ शोधून काढलाय ज्याने स्मार्टफोनचं बाहेरील कव्हर तयार केलं जाऊ शकतं. या कव्हरन घातक व्हायरस आणि बॅक्टेरिया पसरण्यास रोखण्याची मदत मिळते. ब्रिटीश वैज्ञानिकांनी एका थ्रीडी प्रिंटेड पदार्थ तयार केला असून यान अ‍ॅंटीबायोटिकने सुद्धा नष्ट न होणारे बॅक्टेरिया नष्ट होतील. जसे की, 'एमआरएसए'.  

वैज्ञानिकांनुसार, हा पदार्थ रोजच्या वापरातील उत्पादने, हॉस्पिटल, दरवाज्याचे हॅंडल, खेळणी आणि इतरही काही ठिकाणांवर केला जाऊ शकतो. हा पदार्थ बॅक्टेरिया पसरण्यापासून रोखतो.

युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डचे वैज्ञानिक कॅंडिस माज्यूस्की म्हणाले की, नुकसानकारक बॅक्टेरिया पसरू न देणे, संक्रमण आणि अ‍ॅंटीबायोटिकच्या वापराचा विषय चिंतेचा झाला आहे. सध्या कोणत्याही थ्रीडी प्रिंटेड उप्तादनात कोणतीही खासियत नाही. त्यामुळे आता उत्पादनांची निर्मिती करत असताना त्यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल पदार्थाचा वापर केल्यास समस्या बऱ्याचअंशी कमी केली जाऊ शकते.

कसा लावला शोध?

युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी थ्रीडी प्रिटिंग टेक्निकला सिल्वर आधारित अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल पदार्थासोबत मिळून एक पदार्थ तयार केला. अभ्यासक म्हणाले की, आम्ही व्यावसायिक रूपाने उपलब्ध अ‍ॅंटी-मायक्रोबिअल पदार्थ बायोकोटो बी65003 ला लेजर सिनटेरिंग पावडरसोबत मिश्रित केलं आणि एक अ‍ॅंटी-मायक्रोबिअल पदार्थ तयार केला. याचा वापर कोणत्याही प्रकारच्या उत्पादनात केला जाऊ शकतो. 

थ्रीडी प्रिटिंगने जोडला जाणार पदार्थ

(Image Credit : phys.org)

रिसर्चनुसार, हा पदार्थ सध्या उपलब्ध असलेल्या थ्रीडी प्रिटिंग टेक्निकसोबत जोडलं जाणार आहे. याद्वारे तयार करण्यात आलेले उपकरण नुकसानकारक व्हायरस नष्ट करण्यात सक्षम असतील. याची यशस्वी टेस्ट लॅबमध्ये करण्यात आली.

काय आहे एमआरएसए बॅक्टेरिया?

एमआरएसए म्हणजे मेथिसिलिन स्टॅफिलोकोकस ऑरिअस एकप्रकारचा बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाने त्वचा, रक्त आणि हाडांना संक्रमण होतं.  या बॅक्टेरियावर अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा काहीच प्रभाव होत नाही. त्यामुळे उपचार कठिण होतात. हा व्हायरस ३० टक्के लोकांमध्ये नाक, काखेत, कंबरेतून पसरतो.


Web Title: Scientist make antibacteria phone cover for disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.