कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 12:09 PM2020-09-01T12:09:07+5:302020-09-01T12:17:58+5:30

CoronaVirus News & Latest Updates : संक्रमणानंतर  उद्भवलेल्या गंभीर समस्या या चिंतेचं कारण ठरल्या आहेत.  

Scientist said the effect of infection on the organs of human recovering from coronavirus | कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा

कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. मेडिसिनल केमेस्ट्रीचे प्रसिद्ध तज्ज्ञ प्राध्यापक रामशंकर उपाध्याय यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर बऱ्या होत असलेल्या लोकांच्या फुफ्फुसांवर आणि नर्वस सिस्टिमवर संक्रमणाचा परिणाम दिसून येत आहे. संक्रमित लोक बरे झाल्यानंतर  शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम दिसून येत आहे. तुम्ही याबाबत कधी विचारही केला नसेल. संक्रमणानंतर  उद्भवलेल्या गंभीर समस्या या चिंतेचं कारण ठरल्या आहेत.  

प्राध्यापक उपाध्याय यांनी सांगितले की, ''जगभरात कोरोना संक्रमित लोकांची संख्या २ कोटींच्यावर गेली आहे.  'द लँसेट'मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या उपचारांनंतर ५५ टक्के रुग्णांना नर्वस सिस्टीमची समस्या उद्भवली आहे. जर्मनीमध्ये झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, संक्रमणातून बाहेर आलेल्या ७५ टक्के लोकांच्या हृदयावर परिणाम झाला होता. ''

त्यांनी पुढे सांगितले की, ''कोरोनातून बरं झाल्यानंतर उद्भवत असलेल्या शारीरिक स्थितीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. कोरोनातून बरं झालो म्हणजे शारीरीकदृष्ट्या निरोगी आहोत असं नाही. इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न केलं जात आहेत. याशिवाय संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी तसंच संक्रमण रोखण्यासाठी औषध शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राध्यापक उपाध्याय यांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास  कॅन्सरची १५ औषधं आणि एंटी इंफ्लेमेटरी औषधं कोरोनाच्या लक्षणांवर उपचारांसाठी परिणामकारक ठरत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे.''

 भारतात औषधांच्या उत्पादनांबद्दल त्यांनी सांगितले की, ''अनेक एक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्सपासून औषध तयार केली जातात ती औषधं ७५ ते ८० टक्के चीनमधून आलेली असतात. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी ही औषधं एपीआय भारतातच तयार व्हायला हवीत.'' अनेक महत्वपूर्ण औषधांचा शोध लावण्यासाठी डॉ. उपाध्याय यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. जवळपास २० पेटंट त्यांना मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये त्यांचे अनेक शोध प्रकाशित करण्यात आले आहे. 

हे पण वाचा-

युद्ध जिंकणार! भारतानं आखला कोरोना लसीचा 'ग्लोबल प्लॅन'; पाक वगळता इतर देशांना होणार फायदा

मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

Web Title: Scientist said the effect of infection on the organs of human recovering from coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.