सावधान! गंजलेल्या पाईपांमधून येणारं पाणी प्यायल्यानं होऊ शकतो कॅन्सर; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 06:09 PM2020-12-07T18:09:17+5:302020-12-07T18:10:09+5:30

Health Tips in Marathi: पिण्याचे पाणी आणि गंजलेल्या पाईपांसंदर्भात झालेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे.

Scientists are warning that drinking water from rusted pipes can cause cancer | सावधान! गंजलेल्या पाईपांमधून येणारं पाणी प्यायल्यानं होऊ शकतो कॅन्सर; तज्ज्ञांचा दावा

सावधान! गंजलेल्या पाईपांमधून येणारं पाणी प्यायल्यानं होऊ शकतो कॅन्सर; तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये येणारं पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचतं. घरात कोणत्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पोहोचते. ती पाईपलाईन योग्य स्थितीत आहे की नाही हे पाहण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. आता पाण्याच्या  पाईपांसंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील रिव्हरसाइड येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये पिण्याचे पाणी आणि गंजलेल्या पाईपांसंदर्भात झालेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे.

नवीन संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार पाण्याचे पाईप गंजलेले असतील आरोग्याला गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. पाईपमधील लोखंडाचा गंज आणि पिण्याच्या पाण्यामधील अशुद्धता घालवण्यासाठी वापरण्यात आलेले निर्जंतुकीकरणाच्या औषधांमधील काही घटकांची रासायनिक प्रक्रिया होते.  यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण करणारे घटक पाण्याच्या माध्यमातून माणसांच्या शरीरात प्रवेश करतात.

पाण्यात टाकायच्या औषधांमधील घटक आणि गंज लागलेल्या पाईपामधील रासायनिक प्रक्रियेनंतर तयार झालेल्या घटकांना कार्सियोजेनिक हेक्साव्हेलेंट क्रोमिएम असं म्हणतात. क्रोमिएम हा धातू नैसर्गिकपणे माती आणि जमीनीखालील पाण्यामध्ये काही प्रमाणात असतो. क्रोमिएममुळे लोखंड लवकर गंज पकडत नाही. मात्र काही रासायनिक प्रक्रियांमध्ये क्रोमिएमच्या मूल घटकांमध्ये बदल होतो आणि त्याचे रुपांतर हेक्साव्हेलेंटमध्ये होतं. या हेक्साव्हेलेंटमुळे जणुकांवर परिणाम होऊन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

खुशखबर! Molnupiravir या औषधाने केवळ २४ तासात बरे होणार कोरोनाचे रुग्ण, तज्ज्ञांचा दावा

मार्लेन अ‍ॅण्ड रोजमेरी बोर्न्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये पाण्याचे रसायनशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारे प्राध्यापक आणि रसायनशास्त्रज्ञ हायजोऊ लुई यांनी यासंदर्भातील संशोधन केलं आहे. या अभ्यासामध्ये संशोधकांनी पाच ते सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी वाहून नेणाऱ्या पाईप्सचे सॅम्पल्स घेतले होते.  या संशोधनासाठी पाईपांवरील गंज काढून त्याची पावडर करण्यात आली. त्यानंतर या पावडरमध्ये क्रोमियमचे प्रमाण किती आहे याची तपासणी करण्यात आली. याचे सॅम्पल्स हायपोक्लोरस अ‍ॅसिडमध्ये टाकण्यात आले.

'या' उपायाने ४५ टक्क्यांनी कमी होतोय जीवघेण्या व्हायरसचा धोका, संशोधनातून खुलासा

पिण्याचे पाणी ज्या प्रकल्पांमधून येते तिथे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी हायपोक्लोरस अ‍ॅसिड प्रकारातील क्लोरिन वापरले जात असल्याने या अ‍ॅसिडची निवड करण्यात आली. दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या वाढत आहे. अशात हे संशोधन समोर आल्यानं चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यामध्ये हे घातक घटक निर्माण होऊ नयेत म्हणून क्रोमियमसोबत रासायनिक प्रक्रिया न करणाऱ्या रसायनांचा समावेश असणारी औषधं पाणी शुद्धीकरणासाठी वापरायला हवीत, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Web Title: Scientists are warning that drinking water from rusted pipes can cause cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.