वैज्ञानिकांचा दावा - पाण्याने गुरळा करून जाणून घेऊ शकता हृदय रोगाचा धोका, जाणून घ्या कसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 03:10 PM2023-08-22T15:10:31+5:302023-08-22T15:10:56+5:30

Heart Diseases : जर तुम्हाला तुमच्या हृदयाचं आऱोग्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एक सामान्य घरगुती टेस्ट करूनही जाणून घेऊ शकता. ज्याद्वारे तुम्हाला कोणत हृदयरोग आहे का हे कळेल.

Scientists claim mouth rinse with saline water can detect heart disease risk | वैज्ञानिकांचा दावा - पाण्याने गुरळा करून जाणून घेऊ शकता हृदय रोगाचा धोका, जाणून घ्या कसा!

वैज्ञानिकांचा दावा - पाण्याने गुरळा करून जाणून घेऊ शकता हृदय रोगाचा धोका, जाणून घ्या कसा!

googlenewsNext

Heart Diseases : हृदयरोगांमुळे जगभरात सगळ्यात जास्त मृत्यू होतात. हाय बीपी, वॉल्व डिजीज, हृदयाचे अनियमित ठोके, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर असे घातक आजार आहेत ज्यामुळे जीवाला धोका होतो. हृदयरोग रोखण्यासाठी हृदयासंबंधी अनेक मेडिकल टेस्ट आहेत. पण त्यासाठी पैसेही मोजावे लागतात.

जर तुम्हाला तुमच्या हृदयाचं आऱोग्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एक सामान्य घरगुती टेस्ट करूनही जाणून घेऊ शकता. ज्याद्वारे तुम्हाला कोणत हृदयरोग आहे का हे कळेल. केवळ पाण्याने गुरळा करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला हार्ट डिजीज होण्याचा धोका आहे की नाही. 

वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, या सोप्या उपायाने तुम्ही काही सेकंदात हे जाणून घेऊ शकता की, तुमचं हृदय योग्यपणे काम करत आहे की, नाही.  फ्रंटियर्स इन ओरल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, हृदयरोगाचा धोका ओळखण्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी एक पद्धत शोधण्यात आली आहे.

Saline water ने गुरळा करून ओळखा हृदयाचं आरोग्य

फ्रंटियर्स इन ओरल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये आढळून आलं की, सेलाइन वॉटरने गुरळा करून हृदयरोगाचा धोका जाणून घेण्यास मदत मिळू शकते. अभ्यासकांचं मत आहे की, गुरळा केल्यावर तोंडातून निघालेल्या लाळेतील व्हाइट ब्लड सेल्सचं अधिक प्रमाण हे दाखवतं की, तुमच्या हृदयात काहीतरी गडबड सुरू आहे.

कसं कळतं हृदयाचं आरोग्य

रिसर्चमध्ये सहभागी सगळ्या लोकांना पाण्याने गुरळा करण्यास सांगण्यात आलं आणि त्यांच्या लाळेतील व्हाइट सेल्सची लेव्हल मोजण्यात आली. वैज्ञानिकांना आढळून आलं की, लाळेत व्हाइट सेल्स अधिक असतील हिरड्यांमध्ये सूज असल्याचं संकेत आहे आणि हा संकेत हृदयरोगासोबत जुळलेला असू शकतो. टीमने सांगितलं की, याचं जास्त प्रमाण हृदयाच्या धमण्या खराब झाल्याचा पहिला संकेत आहे. 

हृदयाशी संबंधित आहे हिरड्यांची समस्या

अभ्यासकांनी सांगितलं की, हिरड्यांची सूज ब्लड फ्लोच्या माध्यमातून धमण्यांना प्रभावित करू शकते. हिरड्यांमध्ये सूज, ज्याला मेडिकल भाषेत पेरियोडोंटायटिस म्हटलं जातं. ही समस्या हृदयरोगासंबंधी आहे. हिरड्यांमधील सूज धमण्यांमध्ये नायट्रिक ऑक्साइड बनवण्याची क्षमता खराब करते. 

हिरड्यांची समस्या असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा जास्त धोका

हार्वर्ड हेल्थच्या एका रिपोर्टनुसार, हिरड्यांसंबंधी आजाराने पीडित लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा इतर हृदयासंबंधी गंभीर आजाराचा धोका जास्त असतो.

हिरड्यांच्या आजाराचे लक्षण 

हिरड्यांमध्ये सूज आणि मुलायमपणा

हिरड्यांमधून रक्त येणे

श्वासांची दुर्गंधी जी जात नाही

हिरड्यांच्या रेषांवर प्लाक जमा होणे

कारण नसताना दात सैल होणे

Web Title: Scientists claim mouth rinse with saline water can detect heart disease risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.