कोरोनानंतर 'या' आजारानं वाढवली चिंता; जगप्रसिद्ध आर्टिमिसिनिन औषध ठरतंय निरुपयोगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:29 PM2020-08-17T15:29:56+5:302020-08-17T15:52:53+5:30
या आजारासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो. त्यातील एक आर्टिमिसिनिन' हे औषध आहे.
कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या माहामारीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत एका नवीना आजाराबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. मलेरिया हा डासांपासून पसरत असलेला साथीचा रोग असून प्रोटोजोआ परजीवीद्वारे या आजाराचा प्रसार होतो. हा आजार अमेरिकेपासून, आशिया आणि आफ्रिक्रेच्या बेटांपर्यंत पोहोचला आहे. एका रिपोर्टनुसार दरवर्षी ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना या आजाराचा सामना करावा लागतो. तसंच लाखो लोकांचा मृत्यूदेखील होतो. या आजारासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो. त्यातील एक आर्टिमिसिनिन' हे औषध आहे.
याचा वापर जगभरात मलेरियाच्या उपचारांसाठी केला जातो. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं की, हे औषध मलेरियाच्या रुग्णांना बरं करण्यासाठी परिणामकारक ठरत नाही. आता जागतिक स्तरावर आर्टिमिसिनिन' हे औषध निरूपयोगी ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. ही घटना आफ्रिकेतील रवांडा देशातील आहे. ज्या ठिकाणी मलेरियाचे औषध आर्टिमिसिनिन रुग्णांवर परिणामकारक ठरत नाही.
याआधीही दक्षिण पूर्व आशियात मलेरियाच्या तब्बल ८० टक्के रुग्णांवर या औषधाचा परिणाम दिसून आला नव्हता. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेतील रवांडात मलेरियाचा परजीवी आढळून आला आहे. या आजाराच्या उपचारांसाठी हे औषध निरोपयोगी ठरत आहे. हा अभ्यास नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोणताही व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या आजारावर औषधं काम करत नाहीत. याचा अर्थ अस की व्हायरसने आपली क्षमता वाढवली आहे. ताप, थंडी वाजणं, उलट्या होणं, सांधेदुखी ही या आजाराची लक्षणं आहेत. चार ते सहा तासांनी ताप उतरतो आणि घाम यायला सुरूवात होते. तुम्हालाही अशीच लक्षणं दिसत असतील तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
दरम्यान एका रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी जवळपास १८ लाख लोकांना मलेरिया आजाराचा सामना करावा लागतो. संपूर्ण जगात मलेरियाने प्रभावित देशांपैकी ८० टक्के केसेस भारत, इथियोपिया, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये आढळतात. भारतात ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि मेघालय राज्यांमध्ये मलेरियाची सर्वात जास्त प्रकरणे बघायला मिळतात. वर्ल्ड मलेरिया रिपोर्टनुसार, मलेरियाचे टाइप पी विवेक्समध्ये संपूर्ण जगात ८० टक्के केसेस जास्तीत जास्त तीन देशात बघायला मिळतात. त्यात भारताचाही समावेश आहे.
कसा करावा बचाव?
- ब्लड टेस्ट करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही औषध घेऊ नका.
- जर औषधांचा पूर्ण डोज घेतला नाही तर मलेरिया पुन्हा होण्याचा धोका असतो.
- रुग्णाला मच्छरदानीमध्ये ठेवा. कारण डास जर रुग्णाला चावून घरातील इतर कुणाला चावेल तर त्यांना हा आजार होऊ शकतो. रुग्णाला ताप आल्यावर ७ दिवसांपर्यंत शरीरात व्हायरस कायम राहतो. जर रुग्णाला व्हायरल आहे तर त्यांच्या वस्तूंचा वापर करु नका.
(टिप : वरील सल्ले किंवा मुद्दे हे माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. तुम्हाला काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हे पण वाचा-
..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा
शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार