मोठं यश! कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरला मुळातून नष्ट करणाऱ्या व्हायरसचा शोध! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 09:55 AM2019-11-11T09:55:53+5:302019-11-11T09:56:15+5:30

एकदा कॅन्सर म्हणजेच कर्करोग झाला की, त्यातून सुटका नाहीच, असा कॉमन विचार असतो. पण काही लोक कॅन्सरशी लढा देऊन त्यातून बाहेर पडतात.

Scientists found a virus that will cure all types of cancer clinical trial soon | मोठं यश! कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरला मुळातून नष्ट करणाऱ्या व्हायरसचा शोध! 

मोठं यश! कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरला मुळातून नष्ट करणाऱ्या व्हायरसचा शोध! 

googlenewsNext

एकदा कॅन्सर म्हणजेच कर्करोग झाला की, त्यातून सुटका नाहीच, असा कॉमन विचार असतो. पण काही लोक कॅन्सरशी लढा देऊन त्यातून बाहेर पडतात. पण जास्तीत जास्ती केसेसमध्ये कॅन्सर रूग्णाला जीव गमवावा लागतो. अशात वैज्ञानिकांनी एक असा व्हायरस शोधल्याचा दावा केलाय, ज्याने कोणत्याही प्रकारचा कॅन्सर नष्ट केला जातो. मेडिकल क्षेत्रात याकडे एक मोठं यश म्हणून पाहिलं जातंय. 

वैज्ञानिकांनी शोधलेल्या या व्हायरसला वॅक्सीनिया सीएफ-३३ असं नाव देण्यात आलं आहे. सध्या जगभरात १०० पेक्षा अधिक जास्त कॅन्सर आढळतात. कोणत्याही कॅन्सरची माहिती तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजवर झाली तर त्यावर उपचार करणं कठीण होतं. पण आता या रिसर्चमुळे वैज्ञानिक ही आशा करत आहे की, लवकरच कॅन्सर मुळातून नष्ट केला जाईल. जर टेस्टमध्ये सगळं काही ठीक राहिलं तर पुढील वर्षीच या व्हायरसचा औषध म्हणून ब्रेस्ट कॅन्सर रूग्णांवर वापर केला जाईल.

उंदरांवर यशस्वी ठरला प्रयोग

रिपोर्ट्सनुसार, हा एक असा व्हायरस आहे, जो शरीरात सर्दी-खोकल्याचं कारण ठरतो. पण याचा कॅन्सर सेल्ससोबत प्रयोग केल्यावर वैज्ञानिक हैराण झाले. टेस्ट दरम्यान या व्हायरसने पेट्री डिशमध्ये सर्वच प्रकारच्या कॅन्सरला नष्ट केलं. त्यानंतर उंदरांवर प्रयोग केल्यावर वैज्ञानिकांना आढळलं की, या व्हायरसने ट्यूमरचा आकार कमी केला. हा व्हायरस ऑस्ट्रेलियन कंपनी इम्यूजीनने तयार केलाय. हा व्हायरस तयार करण्याचं श्रेय अमेरिकेतील वैज्ञानिक आणि कॅन्सर स्पेशालिस्ट प्रा. युमान  फॉन्ग यांना जातं.

कसा तयार केला व्हायरस?

प्रा. फॉन्ग यांनी सांगितले की, कॉउपॉक्स नावाचा एक व्हायरस असतो, जो गेल्या २० वर्षांपासून चीकनपॉक्स आजार ठीक करण्यासाठी वापरला जातो. आणि याचा मनुष्यांच्या शरीरावर काहीही दुष्परिणाम बघायला मिळाला नाही. काउपॉक्स नावाच्या या व्हायरसला काही इतर व्हायरसमध्ये मिश्रित केल्यावर उंदरांच्या ट्यूमरवर याची ट्रायल घेण्यात आली. ट्रायलमध्ये आढळलं की,  उंदरांच्या शरीरात कॅन्सर सेल्स आकुंचित होऊ लहान झाल्या होत्या आणि त्यांची वाढही थांबली होती. 

ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर रूग्णांवर घेणार ट्रायल

प्रा. फॉन्ग ऑस्ट्रेलियामध्ये या व्हायरसच्या क्लिनिकल ट्रायलची तयारी करत आहे. नंतर याची इतरही देशात टेस्ट घेतली जाणार आहे. या ट्रायल दरम्यान ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, मेलानोमा, फुप्फुसाचा कॅन्सर, ब्लाडर कॅन्सर, पोटाचा कॅन्सर असलेल्या रूग्णांवर टेस्ट केली जाणार आहे. उंदरांवर जरी या व्हायरसचे सकारात्मक परिमाण दिसले असले तरी मनुष्यांवर याचा प्रभाव कसा दिसेल हे सांगता येणार नाही. याची टेस्ट केली जाणार आणि याच्या दुष्परिणामांची तपासणी केली जाणार. 


Web Title: Scientists found a virus that will cure all types of cancer clinical trial soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.