Nobel Prize for Medicine 2020: ३ शास्त्रज्ञांना Hepatitis C virus च्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 04:23 PM2020-10-05T16:23:38+5:302020-10-05T16:42:38+5:30

Nobel Prize for Medicine 2020: मेडिसीन क्षेत्रातील मानकर्‍यांना निवडण्याासाठी ५ तज्ज्ञांची टीम काम करत होती. त्यानुसार हिपेटायटीस सी च्या व्हायरसचं संशोधन करणार्‍या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Scientists who helped identify hepatitis c virus win 2020 nobel medicine prize | Nobel Prize for Medicine 2020: ३ शास्त्रज्ञांना Hepatitis C virus च्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize for Medicine 2020: ३ शास्त्रज्ञांना Hepatitis C virus च्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर

googlenewsNext

(Image credit- Business today, Niklas Elmehed)

स्टॉकहोम:  स्वीडनच्या स्टॉक होम शहरात वैद्यकिय क्षेत्रातील औषधांच्या पुरस्काराची  घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी या नोबल पुरस्कर हार्वे अल्टर, मायकल होऊगटन आणि चाल्स राईस यांना देण्यात आला आहे. या वैज्ञानिकांना हिपेटायटीस सी व्हायरसच्या संशोधनातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.   काही वेळापूर्वीच त्याची अधिकृत घोषणा Karolinska Institutet in Stockholm मध्ये नोबेल फोरम वर करण्यात आली आहे. दरवर्षीच या पुरस्काराच्या विजेत्यांबद्दल कुतुहल असते. मेडिसीन क्षेत्रातील मानकर्‍यांना निवडण्याासाठी ५ तज्ज्ञांची टीम काम करत होती. त्यानुसार हिपेटायटीस सी च्या व्हायरसचं संशोधन करणार्‍या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैज्ञानिकांच्या या कामगिरीबद्दल तब्ब्ल ११ लाख  २० हजार डॉलरचा निधी बक्षिस देण्यात आला आहे. ही रक्कम तिन्ही वैज्ञानिकांमध्ये सम प्रमाणात वितरीत केली जाणार आहे. या पुरस्कराची घोषणा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वीडनच्या स्टॉकहोम शहरातच झाली आहे. यात आठवड्यात अन्य नोबेल पुरस्कारही देण्यात येणार आहेत. मायकल होऊगटन, चाल्स राईस आणि हार्वे अल्टर रॉकफेलर विद्यापीठातील आहेत. १९०१ ते २०१८ या कालावधीत वैद्यकीय क्षेत्रातील २१६ व्यक्तींना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २१६ व्यक्तींपैकी आतापर्यंत १२ महिलांना पुरस्कार देण्यात आला आहे. २००९ साली दोन महिलांना हा पुरस्कार देण्यात आला होता. दरवाज्याचं हॅंडल आणि बटन दाबल्याने पसरत नाही कोरोना व्हायरस, नव्या रिसर्चमधून दावा....

‘हिपेटायटीस सी’वर अद्याप लस नाही. हिपेटायटीस सी’ या आजारावर जी नवी औषधे उपलब्ध झाली आहेत, ती वैद्यकीय संशोधनाचा एक उच्चांक मानला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे ७० दशलक्ष हिपेटायटीसच्या केसेस आढळतात. तर ४ लाख जणांचा मृत्यू होतो. लिव्हरचं नुकसान करण्यास, लिव्हर कॅन्सरसाठी हिपेटायटीस सी हा व्हायरस कारणीभूत ठरतो.  साधारणपणे ३-४ महिने फक्त दोन गोळ्या रोज घेऊन या आजाराचे काही टक्के रुग्ण बरे होतात. पुढच्यावर्षी जुलैनंतर 5 पैकी एका व्यक्तीला मिळणार कोरोनाची लस; जाणून घ्या सरकारचा 'हा' प्लॅन

Web Title: Scientists who helped identify hepatitis c virus win 2020 nobel medicine prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.