कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी नाही पण.......महाराष्ट्रातील तज्ज्ञांचा कोरोना संसर्गाबाबत खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 06:22 PM2021-03-21T18:22:15+5:302021-03-21T18:40:11+5:30
CoronaVirus News & Latest Updates : मुंबईतल्या बीएमसी रुग्णालयांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना वॉर्डमधील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनानं मान वर काढायला सुरूवात केली आहे. देशभरासह महाराष्ट्रात जास्तीत जास्त रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा लागणार का? अशी भीती लोकांच्या मनात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची ही प्रकरणं फार गंभीर नाहीत पण कोरोनाव्हायरस आता युरोपप्रमाणं वेगाने पसरतो आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या बीएमसी रुग्णालयांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना वॉर्डमधील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता परिस्थिती पुन्हा बिघडते आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयांतील सर्व कोविड वॉर्ड भरले आहेत.
डॉ. प्रिन्स सुराना यांनी सांगितले की, ''फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही चेंबूरमधील रुग्णालयातील बेडची संख्या कमी करण्याचा विचार करत होतो. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व बेड फूल झाले. आमचे ९ वेंटिलेटरदेखील फूल आहेत.'' आरोग्य विभागातील एपिडेमिओलॉजीचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, ''महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट सध्या जास्त घातक नाही. पण यावेळी व्हायरस युरोपसारखा वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात 15 ते 21 फेब्रुवारीपर्यंत मृत्यू दर 0.7% होता. जो 15-20 मार्च या कालावधीत 0.32% झाला आहे. 15 फेब्रुवारीपासून आतापर्यंत कोरोना केसेस चौपट झाले आहेत, तर आठवड्याची प्रकरणं तिपटीने वाढली आहेत.''
दरम्यान देशातील पाच राज्यांत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, नवीन 80 टक्के रुग्णांची नाेंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्ण वाढण्यामागे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यातील रुग्णसंख्या कारणीभूत आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण 76.48 टक्के इतके आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारसह त्या - त्या ठिकाणचे राज्य सरकारही सतर्क झाले असून, त्यांनी कठोर निर्बंधांची प्रक्रिया हाती घेतली आहे. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
देशात दैनंदिन रुग्णसंख्या वाढीस महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील संसर्ग कारणीभूत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत त्यांचे प्रमाण तब्बल ८०.६३ टक्के इतके आहे. राज्यात सलग दोन दिवस २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर पंजाबमध्ये २ हजार ३६९, केरळमध्ये १ हजार ८९९ इतके रुग्ण आढळले. सध्या देशात २ लाख ७१ हजार २८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू