कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना सतावतायत 'हे' आजार....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:32 PM2021-05-24T18:32:53+5:302021-05-24T18:33:42+5:30
कोरोना झाल्यानंतर अनेकांना अनेक पोस्ट कोव्हिड आजारांना सामोरे जावे लागले. त्यात अनेक प्रकारचे शारीरीरीक व मानसिक आजाराही आहेत. काही जणांना थकवा, आधी असलेल्या आजारांमुळे त्रास इत्यादी जाणवता. तर काही जणांमध्ये नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात.
कोरोना झाल्यानंतर अनेकांना अनेक पोस्ट कोव्हिड आजारांना सामोरे जावे लागले. त्यात अनेक प्रकारचे शारीरीरीक व मानसिक आजाराही आहेत. काही जणांना थकवा, आधी असलेल्या आजारांमुळे त्रास इत्यादी जाणवता. तर काही जणांमध्ये नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात. असाच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोरोना झाल्यानंतर सतावणारा आजार म्हणजे डिप्रेशन आणि एंजायटी. सामाजिक न्याय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार मेंटल हेल्ध हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करणाऱ्यांमध्ये पोस्ट कोविड डिप्रेशन आणि एंझायटीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यात केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि
हरियाणा सारख्या राज्यातून येणाऱ्या कॉल्समध्ये वाढ झाल्याचेही सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे सांगण्यात आले आहे.
डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन विद डिसेबिलटीजच्या नुसार १६ सप्टेंबर २०२० ते ३० एप्रिल पर्यंत किरण हेल्पलाईनवरती एकुण २६ हजार ०४७ इतके कॉल्स आले. ज्यात मार्च महिन्यामध्ये कॉल्सची संख्या ३,६१७ होती. तर तीच सध्या एप्रिलमध्ये ३,३७१ इतकी कमी झाली होती. परंतू केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा आदी राज्यांमध्ये ही कॉल संख्या वाढलेली होती. ती मार्चमध्ये ७३ वरून एप्रिलमध्ये १७० या फरकाने वाढली होती.
हेल्पलाईन क्रमांकाचा प्रचारही या वाढलेल्या कॉल्सचे कारण असू शकतो
हेल्पलाईनच्या रिजनल सेंटरच्या अधिकाऱ्याने एबीपी न्यूजच्या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार कॉल करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कोव्हिडच्या दुसऱ्या लाटे संदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. अधिकाऱ्याच्या मते कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत केल्या गेलेल्या मेंटल हेल्थ हेल्पलाईनच्या प्रचारामुळे हे कॉल्स वाढले असावेत. केलेल्या कॉल्समध्ये सर्वात जास्त तक्रारी या कोव्हिड-१९च्या सध्याच्या परिस्थीतीबाबत होत्या. तर, व्हॅक्सिनेशन, इमर्जन्सी सर्व्हिस याबातही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हेल्पलाईन सुरु करण्यात आली
१८००-५९९-००१९ ही हेल्पलाईन मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात आली. कॉल करणाऱ्यांच्या तक्रारीनुसार मानसोपचारतज्ज्ञांकडे हा कॉल फॉरर्वड केला जात होता.