विश्वास बसणार नाही 'असं' आहे भूमी पेडणेकरच्या वेटलॉसचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 12:04 PM2020-02-03T12:04:51+5:302020-02-03T12:17:37+5:30

वजन वाढण्याची समस्या केवळ शारीरीक समस्या नसून या समस्येला आजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  

Secret of the actress Bhumi pednekar's weight loss | विश्वास बसणार नाही 'असं' आहे भूमी पेडणेकरच्या वेटलॉसचं सिक्रेट

विश्वास बसणार नाही 'असं' आहे भूमी पेडणेकरच्या वेटलॉसचं सिक्रेट

Next

वजन वाढण्याची समस्या केवळ शारीरीक समस्या नसून या समस्येला आजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  कारण वजन वाढणे ही अनेकदा मानसिक समस्या होऊन बसते. लोकांना आपण अनेक प्रयत्न करून बारीक का होत नाही, आकर्षक का दिसत नाही याबाबत प्रश्न पडलेले असतात. पण तुम्हाला माहित असेल समाजात अशी सुद्धा काही उदाहरणं आहेत. ज्यांनी प्रयत्न करणं न सोडता आपल्या हवी तशी शरीरयष्टी मिळवली. 

त्यापैकीच एक म्हणजे भूमी पेडणेकर ही अभिनेत्री. भूमी पेडणेकरचे फो़टो तुम्ही सगळ्यांनीच पाहिले असतील. वाढलेले वजन कमी करून तीने अनेक लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या महिलांना आत्मविश्वास मिळवून दिला आहे. आज आम्ही तुम्हाला भूमी पेडणेकर या अभिनेत्रीचं कायापालट करण्यामागे नक्की काय सिक्रेट होतं हे सांगणार आहोत.

भूमी पेडणेकरच्या सुंदर आणि आकर्षक फिगरमागंच सगळ्याच महत्वाचं कारण म्हणचे घरचं जेवण. भूमी असं सांगते की तीने कधीही न्युट्रिशियन किंवा डाएटिशियनचा सल्ला घेतला नाही. ती घरचं अन्न खायला प्राधान्य देत असते. इतकेच नाही तर तिला जेवण बनवण्याची खूप आवड आहे. घरी असल्यानंतर भूमीला सर्वाधिक वेळ जेवण बनवण्यासाठी घालवण्यास खूप आवडतं. 

भूमीने सांगितले की ती आहारात साखरेचा समावेश करत नाही.  कार्बोहायड्रेट्स सेवन करण्यावर सुद्धा तिचा कंट्रोल असतो.  घरी तयार केलेलं जेवण हे घरचं असतं. त्यामुळे फिट राहण्यासाठी घरचं जेवण फायदेशीर ठरत असतं.  दम लगाके हैश या चित्रपटासाठी  काम करत असताना वजन वाढलेलं होतं. हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यानंतर वजन कमी करण्यासाठी भूमीने  आपल्या घरच्या जेवणाचा फंडा वापरत वजन कमी केलं. ( हे पण वाचा-वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याआधीच व्हा सावध, काय आहेत लक्षणं आणि उपाय)

Web Title: Secret of the actress Bhumi pednekar's weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.