Fat Loss Secret: शरीरातील चरबी कमी करण्याचे 5 सीक्रेट, एक्सपर्टने सांगितली खास पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 02:56 PM2023-05-24T14:56:45+5:302023-05-24T14:57:09+5:30
काही वेट लॉस सीक्रेट असे असतात जे केवळ तुमची चरबी कमी करतात. चरबी कमी करण्याच्या या सीक्रेटबाबत डायटिशिअन मानसीने माहिती दिली आहे.
जास्तीत जास्त लोक चरबी कमी करण्याच्या नादात मांसपेशीही घटवतात. ज्यामुळे त्यांना अचानक कमजोरी आणि थकवा जाणवू लागतो. याने तुमचं वजन वेगाने कमी होतं, पण शरीरातील अतिरिक्त चरबी काही कमी होत नाही. पण काही वेट लॉस सीक्रेट असे असतात जे केवळ तुमची चरबी कमी करतात. चरबी कमी करण्याच्या या सीक्रेटबाबत डायटिशिअन मानसीने माहिती दिली आहे.
वेट लिफ्टिंगने जळेल चरबी
डायटिशिअन मानसी यांनी सांगितलं की, केवळ चरबी कमी करायची असेल तर वेट लिफ्टिंग केली पाहिजे आणि याने तुमच्या मसल्समध्ये फायबर विकसित होतं. जड वजन उचलल्याने किंवा ओढण्याची एक्सरसाइजने मेटाबॉलिज्म मजबूत होतं. पण यादरम्यान काळजीही घ्यावी.
रिकाम्या पोटी करा एक्सरसाइज
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज सकाळी रिकाम्या पोटी करावी. यावेळी शरीर फास्टच्या स्थितीत असतं. जे फॅट बर्निंगसाठी बेस्ट असतं. यावेळी वेगाने चालल्यासारख्या एक्सरसाइज करणंही फायदेशीर ठरतं.
डिनर लवकर करा
रात्रीचं जेवण लवकर करा आणि हलकं करा. याने तुम्हाला रात्री झोपेपर्यंत गरजेची एनर्जी मिळेल आणि कॅलरी बर्नही होतील. रात्री उशीरा जेवल्याने अन्न फॅट बनून स्टोर होतं.
झोपून बर्न करा चरबी
डायटिशिअननुसार, झोपेदरम्यानही जमा झालेली चरबी बर्न करता येते. कारण झोपेसाठीही शरीराला कॅलरीची गरज असते. यासाठी तुम्ही झोपण्याच्या काही तासआधी जेवण करणं बंद करा आणि झोपेत शरीराला बॉडी रिपेअर करण्यासाठी फॅटचा वापर करू द्या.
पाणी आणि ग्रीन टी
दिवसा पुरेसं पाणी आणि ग्रीन टी चं सेवन करा. याने बीटा ऑक्सीडेशन द्वारे फॅट बर्निंग वेगाने होते.बीटा ऑक्सीडेशन मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्निंगसाठी मदत करतं.