तज्ज्ञांनी शोधलं नेहमी तरूण दिसण्यामागचं रहस्य; मानवी शरीरात दडलाय 'हा' फॉर्मूला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 06:23 PM2020-07-06T18:23:31+5:302020-07-06T18:26:52+5:30
ऑस्टियोकॅल्सिन हाडांमधील जुने टिश्यू काढून नवीन टिश्यूज तयार करतो. याच हार्मोनमुळे आपली उंची वाढते.
नेहमी तरूण दिसण्यासाठी शरीरातील हाडांची मोठी भूमिका असते. हाडांमध्ये जर विशिष्ट प्रकारच्या हार्मोन्सचं संतुलन व्यवस्थित असेल तर वयाआधीच म्हातारं दिसण्याापासून वाचता येऊ शकतं. तज्ज्ञांनी या गोष्टींबाबत माहिती मिळवली आहे की, म्हतारपण लवकर येऊ न देणं हे आपल्या हाडांवर अवलंबून असतं. हाडांमधील एका हार्मोनमुळे व्यक्ती नेहमी तरूण दिसू शकते.
कोलंबिया यूनिवर्सिटीतील जेनेनिक विभागाचे प्राध्यापक गेरार्ड कारसेंटी हे ३० वर्षांपासून हाडांमध्ये लपलेल्या या सिक्रेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी हाडांमध्ये जमा होत असलेल्या ऑस्टियोकॅल्सिन Osteocalcine Hormone वर संशोधन केले होते. त्यात असं दिसून आलं की, ऑस्टियोकॅल्सिन हाडांमधील जुने टिश्यू काढून नवीन टिश्यूज तयार करतो. याच हार्मोनमुळे आपली उंची वाढते. हाडांवरंच आपले संपूर्ण शरीर उभे असते. गेरार्ड यांनी उंदरांवर या हार्मोन्सचे जीन काढून प्रयोग केले होते.
हाडांमुळे शरीरातील वेगवेगळ्या क्रिया प्रभावित होतात. हाडांमध्ये असलेले टिश्यू हार्मोन्सचं संतुलन टिकवून ठेवतात. हाडांमध्ये हार्मोन्स तयार होऊन संपूर्ण शरीरात पसरत असते. त्यामुळेच आपण व्यायाम किंवा कोणतीही क्रिया करू शकतो. व्यायाम केल्याने वाढत्या वयाच्या शरीरावरील खुणांना रोखता येऊ शकतं. त्यामुळे स्मरणशक्तीही चांगली राहते.
प्रो. गेरार्ड कारसेंटी यांनी सांगितले की. जर तुम्हाला लवकर म्हातारं व्हायचं नसेल तर शरीरातील ऑस्टियोकॅल्सिन वाढवण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. नियमित व्यायाम केल्याने शरीरात ऑस्टियोकॅल्सिन जास्तीत जास्त तयार होते. तज्ज्ञांकडून ऑस्टियोकॅल्सिन वाढवण्याची औषध तयार करण्यावर प्रयोग सुरू आहेत.
जेणेकरून म्हातारपणातील समस्या कमी होऊ शकतील. युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रक्तातील प्लाज्माचा काही भाग काढून त्यात सलाईन किंवा एल्बयुमिनचा प्रयोग केल्यास वाढत्या वयाच्या प्रक्रियेला उलट करता येऊ शकते. पण या संशोधनानुसार दररोज न चुकता व्यायाम केल्याने वाढत्या वयाच्या समस्यांपासून लांब राहता येऊ शकतं.
लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना 'या' सायलेंट किलर आजाराचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा
धोका वाढला! भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर; कोरोनाबाबत WHO नं दिली धोक्याची सुचना