एम्समध्ये सिक्यूरिटी गार्डला कोवॅक्सिन दिल्यानंतर समोर आले साईड इफेक्ट्स; रुग्णालयात करावं लागलं दाखल
By manali.bagul | Published: January 17, 2021 09:43 AM2021-01-17T09:43:47+5:302021-01-17T09:47:35+5:30
CoronaVaccine News & Latest Updates : राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये शनिवारी एका गार्डला कोवॅक्सिन लस दिल्यानंतर त्याला एलर्जीप्रमाणे लक्षणं तीव्रेतेनं दिसून आली. त्यानंतर या गार्डला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला काल देशभरात सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण अभियानाचा प्रारंभ केला. मात्र, लसीकरण मोहिमेनंतर कोरोना आटोक्यात येईल, असे नाही. त्यामुळे कोरोना लस घेतल्यानंतरही काही साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत. राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये शनिवारी एका गार्डला कोवॅक्सिन लस दिल्यानंतर त्याला एलर्जीप्रमाणे लक्षणं तीव्रेतेनं दिसून आली. त्यानंतर या गार्डला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
एम्स रुग्णालयातील प्रमुख तज्ज डॉ. रणदिप गुलेरिया यांनी सांगितले की, संध्याकाळी चार वाजता या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लस देण्यात आली होती. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी या गार्डच्या हृदयाचे ठोके वाढले होते याशिवाय शरीरावर लाल चट्टे उठले होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, ''लक्षणं दिसताच त्वरित या गार्डवर उपचार करण्यात आले असून आता त्याची प्रकृती बरी आहे. रात्रभर या गार्डला डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. पूर्णपणे बरं वाटल्यानंतर या माणसाला घरी पाठवण्यात येईल. आकडेवारीनुसार (एईएफआय) गंभीर आजारी असलेल्या, ५० पेक्षा जास्त वय असेलल्या तसंच आरोग्य कर्मचारी वर्गाचे काल लसीकरण करण्यात आले.'' Co-WIN अॅपवर रजिस्टर केल्यानंतरच दिली जाणार कोरोनावरील लस, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया....
कोवॅक्सिन
भारत बायोटेकनं कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही लस तयार करण्यासाठी जुनं तंत्र वापरलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पहिली लस देऊन लोकांना विषाणूची लागण केली जाते. त्यानंतर त्या विषाणूला मारलं जातं. मुंबईतल्या ६ केंद्रांवर कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे.विशेष म्हणजे साईड इफेक्ट्स दिसून आल्यास कंपनीकडून भरपाई दिली जाईल. लस दिली गेल्यावर लोकांना एक फॅक्टशीट दिली जाईल. त्यात त्यांना पुढील ७ दिवसांत दिसणाऱ्या लक्षणांची माहिती नोंदवावी लागेल. स्मोकिंग करणाऱ्यांपेक्षाही जास्त खराब होऊ शकतात कोरोना रुग्णांची फुफ्फुसं; डॉक्टरांचा दावा
कोविशिल्ड
कोविशील्डची निर्मिती ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटन-स्वीडनमधील फार्मास्युटिकल कंपनी ऍस्ट्राझेनेकानं मिळून केली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशील्ड लसीचं उत्पादन केलं आहे. कोविशील्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम अतिशय चांगले आहेत. या लसीचे दोन डोज अतिशय परिणामकारक असल्याचं सांगितलं गेलं.
ब्रिटनमध्ये लसीच्या चाचण्या ९०-९५ टक्के प्रभावी ठरल्या. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या शरीरात अँटीबॉडी आणि व्हाईट ब्लड सेल्स (टी-सेल्स) विकसित झाल्या. कोविशील्ड लस मॉर्डना आणि फायझरच्या लसीपेक्षा बरीच वेगळी आहे.