बघा, तुम्ही अति व्यायाम तर करीत नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:14 PM2017-11-14T16:14:24+5:302017-11-14T16:15:00+5:30
लेने के देने पड जायेंगे भाई!
- मयूर पठाडे
आपल्याकडे दोन प्रकारचे लोक दिसतात. म्हणजे आरोग्याचं, व्यायामाचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे, पण व्यायामाला वेळच मिळत नाही म्हणून तक्रार करणारे, धुसफुसणारे लोक एकीकडे तर अति प्रमाणात व्यायाम करणारे लोक दुसरीकडे.
व्यायामाचा फायदा होतो हे ठीक, पण किती व्यायाम करायचा? त्याला काही तारतम्य आहे की नाही? व्यायामाची ही नशा तुमचं आरोग्य सुधरवण्यासाठी नाही तर तुमचं आरोग्य बिघडवण्यासाठीही कारणीभूत ठरू शकते. आजकाल व्यायामाच्या नशेनं झपाटलेले अनेक जण आहेत. विशेषत: तरुण आणि त्यांची संख्या अजिबात कमी नाही. या अतिरेकी व्यायामामुळे अनेकांनी आपल्या तब्येतीचं वाटोळं करून घेतलेलं आहे.
काय होतं अति व्यायाम केल्यानं? खरं तर काय होत नाही अति व्यायामानं असंच विचारलं पाहिजे.
अति व्यायामामुळे आपले स्नायुबंध कमजोर होतात. हाडं कमजोर होतात, कुर्चाच्या तक्रारी वाढतात. लिगामेण्ट आणि जॉइंटस कायमचे दुखायला लागतात आणि मग नंतर ते इतक्या तक्रारी देतात की ज्याचं नाव ते!
साधी साधी दुखणी, दुखापती.. त्याही लवकर नीट होत नाहीत आणि मग कायमस्वरुपी दुखण्यात त्याचं रुपांतर होतं.
त्यात जर तुम्ही योग्य पोषणयुक्त आहार घेत नसाल, पुरेशी विश्रांती घेत नसाल, तर तुमचे मसल्सच ब्रेक डाऊन होतात आणि तुमच्यात काहीच शक्ती, त्राण उरत नाही.
मग याला उपाय काय? किती व्यायाम करायचा? कसं ओळखायचं आपण ‘अति‘ करतो आहोत की नाहीत ते? त्याची काही चिन्हं आपल्याला दिसतात का?
- हो नक्कीच दिसतात आणि मग आपण पक्कं समजून घ्यायचं बास. आता व्यायाम पुरे!
आपलं शरीर त्याविषयी आपल्याशी बोलतंच. त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..