हृदयाच्या ठोक्यांनी रिचार्ज होणार इम्प्लांटेड डिवाइस, नाण्याच्या आकाराची किट तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:00 PM2019-02-13T12:00:29+5:302019-02-13T12:03:09+5:30
शरीरात पेसमेकर इम्प्लांट लावल्यानंतर दर ५ ते १० वर्षांनी बॅटरी बदलण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्जरीचीचा त्रास आता दूर होणार आहे.
(Image Credit : Engadget)
शरीरात पेसमेकर इम्प्लांट लावल्यानंतर दर ५ ते १० वर्षांनी बॅटरी बदलण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्जरीचीचा त्रास आता दूर होणार आहे. कारण अमेरिकेतील संशोधकांनी एक अशी किट तयार केली आहे, जी हृदयाच्या ठोकांपासून वीज तयार करून इम्प्लांटला ऊर्जा देईल. यात लावण्यात आलेली किट हृदयाच्या ठोक्यांमधून निघणारी ऊर्जा वीजेत रूपांतरित होईल, आणि याने इम्प्लांट डिवाईस रिचार्ज होणार आहे.
अमेरिकेच्या डार्थमाऊथ कॉलेजच्या संशोधकांनी नाण्याच्या आकाराचा एक किट तयार केली आहे. ही किट हृदयाच्या ठोक्यांपासून येणारी ऊर्जा वीजेमध्ये रूपांतरित करते. यात असलेल्या डिवाइसमुळे पॉलिमर पीजोइलेक्ट्रिक फिल्मचे पातळ तुकडे जोडावे लागतील. ही किट त्यांना रिचार्ज करेल. याच्या मदतीने रुग्णाच्या आरोग्यावरही नजर ठेवली जाईल.
संशोधक लिन डॉन्ग यांच्यानुसार, किट फार हलकी आणि लवचिक आहे. ही किट इम्प्लांटसोबत सहजपणे फिट केली जाऊ शकते. खास बाब ही आहे की, डिवाइस शरीराच्या सामान्य कार्यशैलीवर प्रभाव पडू देत नाही. संशोधकांच्या टीमने या किटचा यशस्वी प्रयोग जनावरांवर केला आहे. लिन डॉन्ग म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, लवकरच सेल्फ रिचार्जिंग पेसमेकर मार्केटमध्ये उपलब्ध होईल.