ज्येष्ठांनाे, आराेग्य सांभाळा थंडीत हृदयाला जपा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:30 AM2021-12-27T10:30:53+5:302021-12-27T10:31:07+5:30
Health : शरीराच्या कुठल्याही एका भागाचे कार्य अचानक बिघडते. साधारणपणे दोन प्रकारचे अर्धांगवायू असतात. पहिला मेंदूच्या विशिष्ट भागात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने होणारा त्यास ‘इस्केमिक स्ट्रोक’ असेही म्हणतात.
मुंबई : थंडीच्या दिवसांत जीवनशैलीमध्ये योग्य बदल केल्यास गंभीर आजारांचे धोके तुम्ही सहजरीत्या टाळू शकता. यासाठी नियमित व्यायाम करणे आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीराच्या कुठल्याही एका भागाचे कार्य अचानक बिघडते. साधारणपणे दोन प्रकारचे अर्धांगवायू असतात. पहिला मेंदूच्या विशिष्ट भागात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने होणारा त्यास ‘इस्केमिक स्ट्रोक’ असेही म्हणतात.
थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते
दरवर्षी हृदयविकाराचा त्रास असलेल्यांना थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. थंडीमध्ये सकाळच्या वेळी अनेक तरुण आणि ज्येष्ठ मंडळी घराबाहेर पडतात. पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास असलेल्या अनेकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
का असतो हृदयविकाराचा धोका ?
थंडीत शरीरातील हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. शरीरातील सर्वच वाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयविकाराचा पूर्वी कोणाला त्रास असेल, तर त्यांना या दिवसांत धोक्याचा इशारा असतो. पूर्वीपासून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेज) असल्यास त्यात थंडीत वाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला रक्तपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
...तर धोका टळू शकतो
जीवनशैलीत सुधारणा. ४५ मिनिटे रोज चालणे. योगा व ध्यान करणे. वजन नियंत्रित करणे. कमी अंतरासाठी गाड्यांचा वापर टाळणे. लिफ्टचा वापर टाळणे. पायऱ्यांचा वापर करणे असे दैनंदिन बदल केल्यास आपण अर्धांगवायूचा धोका टाळू शकतो.
आहाराकडेही लक्ष द्या!
हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा. रोज दहा ते वीस ग्रॅम अक्रोड, बदाम, शेंगदाण्याचे सेवन केल्याने अर्धांगवायू अथवा हृदय विकाराच्या झटक्याला आळा घालू शकतो. मधुमेह वा रक्तदाब असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधी घेतली पाहिजेत. आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
शरीरातील काही द्रव्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयावर ताण येतो. स्वाइन फ्लू किंवा विषाणू जन्य आजारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. सर्दी, खोकल्यामुळेही हृदयावर ताण वाढण्याची शक्यता असते.
- डॉ. गंगाराम जगताप, हृदयरोगतज्ज्ञ