कोरोनानंतर 'हा' आजार ठरणार जगातील सर्वाधिक मृत्यूंचे कारण; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:28 PM2021-09-16T13:28:55+5:302021-09-16T13:37:24+5:30

कोरोनाची लागण झाल्यावर सेप्सिसचा धोका वाढत असल्याचं संशोधनातून नुकतच समोर आलं आहे. डब्ल्यूएचओने देखील सेप्सिस हा कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा अधिक धोकादायक असणार आहे, असा इशारा दिला आहे.

sepsis will kill more people than cancer and heart attack by 2050 WHO warns | कोरोनानंतर 'हा' आजार ठरणार जगातील सर्वाधिक मृत्यूंचे कारण; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनानंतर 'हा' आजार ठरणार जगातील सर्वाधिक मृत्यूंचे कारण; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Next

कोरोना व्हायरस केव्हा संपणार याबाबत कोणाकडेही ठोस उत्तर नाही. मात्र या व्हायरसचे दुष्पपरिणाम दिसून येत आहेत. विशेषत: ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना आधीच काही गंभीर आजार आहेत, त्यांना यीचा जास्त धोका आहे. कोरोनाची लागण झाल्यावर सेप्सिसचा धोका वाढत असल्याचं संशोधनातून नुकतच समोर आलं आहे. डब्ल्यूएचओने देखील सेप्सिस हा कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा अधिक धोकादायक असणार आहे, असा इशारा दिला आहे.

डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, २०५० पर्यंत कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा सेप्सिसमुळे जास्त लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, सेप्सिस ही संसर्गाची सिंड्रोमिक रिएक्शन आहे आणि संसर्गजन्य रोग हे जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण आहेत.

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत की, २०१७ मध्ये जगभरात ४८९ दशलक्ष आणि ११ दशलक्ष केसेस या सेप्सिस मृत्यू पावलेल्यांच्या होत्या. हा आकडा जगातील मृत्यूच्या संख्येच्या २० टक्के आहे.

अफगाणिस्तान वगळता इतर दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत भारतात सेप्सिसमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचंही अभ्यासातून समोर आले आहे. गुरुग्रामच्या इंस्टीट्यूट ऑफ क्रिटिकल केयर अँड एनेस्थिसियोलॉजी, मेदांता द मेडिसिटीचे अध्यक्ष यतीन मेहता यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, "सेप्सिस २०५० पर्यंत कॅन्सर किंवा हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा जास्त लोकांचा बळी घेऊ शकतो. हा सर्वात मोठा किलर ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशात, अँटीबायोटिक्सचा अति वापर बहुधा उच्च मृत्यूचं कारण बनत आहे.''

डेंग्यू, मलेरिया, यूटीआय किंवा अगदी डायरिया सारख्या अनेक सामान्य आजारांमुळे सेप्सिस देखील होऊ शकतो. डॉ मेहता म्हणाले, अँटीबायोटीक्सचा वापर करण्याव्यतिरिक्त, जागरूकतेची कमतरता आणि तात्काळ मिळणाऱ्या उपचारांचा अभाव हे देखील या आजारमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचं एक मोठं कारण आहे.

Web Title: sepsis will kill more people than cancer and heart attack by 2050 WHO warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.