थंड खाल्ल्यानंतर कान आणि घश्यात खाज येत असेल; तर तुम्हालाही असू शकते 'ही' समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 11:13 AM2020-06-29T11:13:03+5:302020-06-29T11:18:13+5:30
ही खाज इतक्या तीव्रतेने येते की व्यक्तीला अस्वस्थ झाल्याप्रमाणे वाटते.
काही लोकांना थंड पदार्थ खाल्यानंतर नाकात किंवा घशात खाज येण्याची समस्या जाणवते. रात्री झोपताना ज्या लोकांच्या घश्यात कफ जमा झालेले असतात, त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. घश्यात कफ जमा होण्याची आणि थंड खाल्यानंतर कानात खाज येण्याची कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आपला नाक, कान, घसा, यांच्या नसा एकत्रित असतात. ज्या लोकांच्या नाकाच्या आतील भागातील हाड सामान्य आकारापेक्षा मोठे किंवा वाकडे असते. त्या लोकांना झोपताना घश्यात कफ जमा होण्याची समस्या उद्भवते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी खोकल्यामुळे घसा साफ व्हायला मदत होते. काही लोकांना खोकला येत नाही. त्यामुळे घशात कफ तसेच जमा राहतात. त्यामुळे उठल्यानंतर सगळ्यात आधी घसा साफ करायला हवा.
ठंड खाल्यानंतर कानात खाज येण्याची समस्या उद्भवते.
घश्यात कफ जमा होण्याची समस्या अनेक वर्षांपर्यंत असेल तर कानाच्या नर्व्समध्ये मॉईश्चर जमा होते. त्यामुळेच नर्व्सला फंगस निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पिडित व्यक्तीने काहीही खाल्यास कानांमध्ये खाज यायला सुरूवात होते. ही खाज इतक्या तीव्रतेने येते की व्यक्तीला अस्वस्थ झाल्याप्रमाणे वाटते.
कानात आणि घशात सतत खाज येत असलेल्या लोकांना चहा किंवा गरम पाणी, सुप प्यायल्यामुळे आराम मिळू शकतो. कारण यामुळे कान आणि घश्यातील नर्व्स शेकले जातात. जर तुम्हाला खाज येण्याचा त्रास जास्त उद्भवत असेल तर सगळ्यात आधी थंड पदार्थांचे सेवन बंद करा. तसंच आंबट पदार्थही खाऊ नका. नाकातील हाडामुळे खाज येण्याची समस्या उद्भवते. अनेकदा अनुवांशिकतेने या समस्येचा सामना करावा लागतो.
या समस्येवर उपाय म्हणून आईस्क्रिम, थंड पाणी असे थंड पदार्थ खाऊ नका. नाकातील हाडाच्या समस्येवर डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट घ्या. योग्य ट्रिटमेंट आणि औषध घेतल्यास ही समस्या कमी करता येऊ शकते. गंभीर स्थितीत सर्जरी सुद्धा करावी लागते. जर तुम्हाला सर्जरी करायची नसेल तर त्यासाठी औषध घेऊन ही समस्या नियंत्रणात ठेवा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून तुम्ही या समस्येपासून लांब राहू शकता.
कोरोनाबाधित रुग्णांना 'या' आजाराचा सगळ्यात जास्त धोका; ३ देशांतील तज्ज्ञांचा खुलासा
CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी