या 3 प्रकारच्या लोकांसाठी पालक ठरू शकते घातक, वाचा काय सांगतात एक्सपर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:27 AM2023-10-05T09:27:13+5:302023-10-05T09:27:54+5:30

spinach side effects : एक्सपर्ट सांगतात की, काही आजारांमध्ये पालकाचं सेवन अजिबात करू नये. याने समस्या आणखी वाढते.

Severe side effects of eating palak or spinach in 3 common diseases according expart | या 3 प्रकारच्या लोकांसाठी पालक ठरू शकते घातक, वाचा काय सांगतात एक्सपर्ट

या 3 प्रकारच्या लोकांसाठी पालक ठरू शकते घातक, वाचा काय सांगतात एक्सपर्ट

googlenewsNext

spinach side effects : पालक भाजी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण काही कंडीशन अशा असतात ज्यात पालकाचं सेवन करणं विषासारखं ठरतं. एक्सपर्ट सांगतात की, काही आजारांमध्ये पालकाचं सेवन अजिबात करू नये. याने समस्या आणखी वाढते.

पालक भाजीतील पोषक तत्व

पालक भाजीमध्ये ते सगळेच पोषक तत्व आढळतात, जे शरीराचं काम योग्यपणे करण्यासाठी गरजेचे आहेत. पालकमध्ये आयरन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतात. 

नियमितपणे पालकाचं सेवन केलं तर बीपी कंट्रोल करणे, डोळे चांगले ठेवणे, डायबिटीस कंट्रोल करण्यास, हृदय निरोगी ठेवण्यात, वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. कोणत्या आजारांमध्ये पालकाचं सेवन करू नये हे आता जाणून घेऊ.

रक्त पातळ करण्याचं औषध घेणारे लोक

जर तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी काही औषधं घेत असाल तर तुम्ही पालकाचं सेवन अजिबात करू नये. कारण यात व्हिटॅमिन के असतं, जे anticoagulant सोबत रिअ‍ॅक्शन करतं.

किडनी स्टोनचे रूग्ण

जर तुम्हाला किडनी स्टोन असेल किंवा किडनी स्टोनची हिस्ट्री असेल तर तुम्ही पालक अजिबात खाऊ नये. कारण या कंडीशनमध्ये तुम्हाला किडनी स्टोन वाढण्याचा किंवा होण्याचा धोका असतो. 

अ‍ॅलर्जी असणारे लोक

डॉक्टरांनी सांगितलं की, पालकांमध्ये हिस्टामिन असतं आणि हे खाल्ल्याने काही लोकांना अ‍ॅलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला अ‍ॅलर्जीची समस्या असेल तर तुम्हाला पालक दूरच ठेवलेली बरी.

Web Title: Severe side effects of eating palak or spinach in 3 common diseases according expart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.