SEX LIFE : हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 11:03 AM2017-02-10T11:03:53+5:302017-02-10T16:34:57+5:30

असे काही खाद्यपदार्थ आहेत त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो शिवाय आपल्या नैसर्गिक लैंगिक क्षमतेलाही नष्ट करते. असे पदार्थ पुरुषांना कमजोर बनवितात.

SEX LIFE: Avoid eating 'these' things for a Happy Sexual Life! | SEX LIFE : हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !

SEX LIFE : हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !

googlenewsNext
ong>-Ravindra More

जेव्हाही कोणी अशक्तपणाविषयी चर्चा करीत असेल तेव्हा प्रौढ व्यक्ति आपणास समतोल आहाराविषयी मार्गदर्शन करतात. समतोल आणि पौष्टिक आहाराने लगेचच कमजोरी दूर होते. महिला असो की पुरुष समतोल आहार घेत असेल तर आणि आपली जीवनशैली व्यवस्थित ठेवत असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. मात्र असे काही खाद्यपदार्थ आहेत त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो शिवाय आपल्या नैसर्गिक लैंगिक क्षमतेलाही नष्ट करते. असे पदार्थ पुरुषांना कमजोर बनवितात. यासाठी आपल्या खाद्यान्नाच्या यादीतून असे पदार्थ वगळायलाच हवेत, जे आपल्या ताकदीला कमी करु शकतील. आजच्या सदरात आपण अशाच काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत जाणून घेऊया.

चीज
चीजमध्ये खूपच जास्त फॅ ट असते. चीजयुक्त पदार्थांच्या अधिक सेवनाने शरीरात विष तयार होते. सोबतच ईस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रोन आणि टेस्टोस्ट्रोन सारखे हार्मोन्सच्या निर्मितीत अडथळे तयार होतात. 

खराब दर्जाचे तेल
खराब दर्जाच्या तेलात बनलेले पदार्थ फ्री रॅडिकल उत्पन्न करतात, जे पुरुषांच्या शरीरासाठी खूपच हानिकारक आहेत. 

पॅकिंग फूड
जे पुरुष सर्वाधिक पॅकिंग फूडचे सेवन करतात, त्यांनी वेळीच सतर्क व्हायला हवे. कारण त्याच्या कोटिंगमध्ये काही विशेष धातू मिक्स केले असतात, जे पुरुषांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम करतात.

मद्यपान
मद्य सेवनाने मूड चांगला होतो मात्र याने झोपही येत असल्याने आपण आपल्या वातावरणाच्या प्रति कमी संवेदनशील बनतात. मद्य सेवनाने अशा रासायनिक क्रिया व्हायला सुरू होतात ज्या टेस्टोस्ट्रोनच्या निर्मितीवर प्रतिकुल परिणाम करतात. असे होणे पुरूषांसाठी हानिकारक मानले जाते.    

जंक फूड
जंक फूडमधील हायड्रोजनयुक्त वसा टेस्टोस्ट्रोनचा स्तर कमी करते त्यामुळे पुरुषांत कमी गुणवत्ताचे आणि असामान्य शुक्राणुंंची निर्मिती होते.

मिंट
मिंटमुळे जरी श्वासाची दुर्गंधी दूर होते मात्र याच्या सेवनाने काम वासनेवर प्रतिकुल परिणाम होत असल्याचे संशोधनात निष्पन्न झाले आह. मिंटमध्ये मेंथॉल असते ज्यामुळे कामोत्तेजना कमी होते. 

सोडा
सोडा आणि सुगंधित पेय पदार्थाच्या सेवनाने वजन आणि मूडवर प्रतिकुल परिणाम होतो. या पेय पदार्थामुळे लठ्ठपणा, दातांचा ढिसुळपणा, मधुमेह सारख्या समस्या निर्माण होतात. सोबतच पुरुषांच्या सेक्स लाइफवरही याचा नकारात्मक प्रभाव पडतो. 

कॉर्न फ्लेक्स
कॉर्न फ्लेक्सचे सेवन पुरुषांसाठी हानिकारक आहे. याच्या अधिक सेवनाने सेक्स लाइफवर अनिष्ट प्रभाव पडतो. 

कॉफी
कॉफीचे अति सेवन पुरुषांसाठी नुकसानकारक ठरु शकते. कॉफीमुळे शरीरात तणाव उत्पन्न करणारा कॉर्टिसॉल हार्माेन तयार होऊ लागतो. शिवाय त्यातील कॅ फीनमुळे हार्माेन असंतुलीत होऊन तणाव निर्माण होतो.

सोयाबीन
सोयाबीनमध्ये फोटोईस्ट्रोजेन असते, जे पुरुषांच्या सेक्स हार्मोनशी प्रतिस्पर्धा करते. यामुळे पुरुषांत प्रजनन, स्तन विकास आणि केसांची गळतीसारख्या समस्या निर्माण होतात. 

लाल मांसाचे सेवन
लाल मांसाचे सेवनाने पुरुषांच्याच नव्हे तर महिलांच्याही सेक्शुअल आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. लाल मांसात जरी प्रोटीन भरपूर प्रमाणात असले तरी याच्या सेवनाने मेल हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. 

चिप्स
चिप्सच्या सेवनाने आपली कामोत्तेजनावर परिणाम होतो, सोबतच आपल्या मांसपेशी आणि आतड्यांनाही नुकसानकारक ठरतात. चिप्स जुन्या तेलात तळलेले असतात शिवाय उच्च तापमानात उत्पादित केले जातात, त्यामुळे ते आरोेग्यासाठी हानिकारक आहेत.  

Web Title: SEX LIFE: Avoid eating 'these' things for a Happy Sexual Life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.