SEX TIPS : पहिल्यांदाच ‘त्या’ मधुर क्षणांचा आंनद घेताय? या गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 11:08 AM2017-03-31T11:08:28+5:302017-03-31T16:40:30+5:30

बहुतांश लोकं अति वेगाने हा आनंद मिळवायचा प्रयत्न करतात, मात्र हाती पडते ती निराशा. यासाठी प्रथमच प्रणय करताना या गोष्टी महत्त्वाच्या असून यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.

SEX TIPS: Enjoying those 'sweet moments' for the first time? These things are important! | SEX TIPS : पहिल्यांदाच ‘त्या’ मधुर क्षणांचा आंनद घेताय? या गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

SEX TIPS : पहिल्यांदाच ‘त्या’ मधुर क्षणांचा आंनद घेताय? या गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

googlenewsNext
ong>-Ravindra More
प्रथमच प्रणयाचा आंनद हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो, मात्र खरा आनंद घेण्यासाठी दोघांचीही मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकदृट्या तयारी असणे गरजेचे असते. बहुतांश लोकं अति वेगाने हा आनंद मिळवायचा प्रयत्न करतात, मात्र हाती पडते ती निराशा. यासाठी प्रथमच प्रणय करताना या गोष्टी महत्त्वाच्या असून यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. 

* सुरक्षितता
पहिल्यांदाच जर सेक्सचा अनुभव घेत असाल तर सुरक्षितता पाळणे अतिशय महत्त्वाचे असते. सुरक्षा पाळल्याने लैंगिक आजारांपासून तर रक्षण होते शिवाय अनावश्यक गर्भधारणाही होत नाही.

* कामक्रीडा 
प्रत्यक्ष सेक्स करण्यापूर्वी जोडीदारासोबत केलेली कामक्रीडा तुम्हाला फार मदत करू शकते. तुमच्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार कामक्रीडा करा व तुमच्या जोडीदाराला काय रुचतेय हे समजून घ्या. एखादे चुंबन, स्पर्श किंवा जोडीदाराला मिठीत घेणे यापैकी काहीही कामक्रीडेचा एक भाग असू शकतो.

* वेदनांमुळे अडथळा नको
पहिल्यांदा सेक्स करताना वेदना होतातच, शिवाय बऱ्याचदा रक्तस्त्रावही होऊ शकतो, मात्र यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. 

* रक्तस्त्राव नाही महत्त्वाचा
पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या खासगी भागाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ हा अतिशय नाजूक पडदा धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा अगदी स्विमिंग सारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे टाळा. भारतात स्त्रीचे पावित्र्य हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. व तिचे पावित्र्य ओळखण्याची कसोटी म्हणजे पहिल्यांदा संभोग करताना रक्तस्त्राव होतो की नाही. मात्र यात फारसे तथ्य नाही. 

* व्हर्जिनिटीचा उहापोह नको 
जर तुम्ही दोघेही व्हर्जिन असाल, तर पाहिल्यांदा सेक्स करताना थोडासा संकोच वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे घाई करण्याऐवजी एकमेकांना समजून घेत ‘त्या’ क्षणांचा आनंद घ्या. काही वेळेस जोडीदारापैकी एक जण व्हर्जिन असण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर स्त्री व्हर्जिन असेल तर तसे उघडपणे तुमच्या जोडीदाराला सांगा. एकमेकांना समजून घेतल्यास गोष्टी सोप्या होतील 

Web Title: SEX TIPS: Enjoying those 'sweet moments' for the first time? These things are important!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.