SEXUAL HEALTH : ​'कंडोम'देखील वाचवू शकत नाही सेक्ससंबंधी ‘या’ समस्यांपासून !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 06:02 AM2017-02-28T06:02:45+5:302017-02-28T11:33:40+5:30

सेक्सने उद्भवणाऱ्या काही समस्यांपासून आपणास कंडोमदेखील वाचवू शकत नाही. चला मग जाणून घेऊया की, त्या कोणत्या समस्या आहेत ते...

SEXUAL HEALTH: 'condom' can not save even from 'these' problems of sex! | SEXUAL HEALTH : ​'कंडोम'देखील वाचवू शकत नाही सेक्ससंबंधी ‘या’ समस्यांपासून !

SEXUAL HEALTH : ​'कंडोम'देखील वाचवू शकत नाही सेक्ससंबंधी ‘या’ समस्यांपासून !

googlenewsNext
ong>-Ravindra More

सेक्ससंबंधी समस्यांपासून वाचण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो मात्र आपणास हे ऐकून चकित व्हाल की, सेक्सने उद्भवणाऱ्या काही समस्यांपासून आपणास कंडोमदेखील वाचवू शकत नाही. चला मग जाणून घेऊया की, त्या कोणत्या समस्या आहेत ते. 

* नागीण-हर्पिस (दाद)
जर समोरच्या व्यक्तिस ‘त्या’ जागी ही समस्या असेल आणि तो भाग सेक्स दरम्यान कंडोमने झाकला जात नसेल तर त्याच्या पार्टनरलाही हा आजार होऊ शकतो. जो पर्यंत ही समस्या पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपण सेक्स करू नये. 

* एचपीव्ही
जर आपण सेक्सुअली अ‍ॅक्टिव्ह असाल तर आपणास सतर्क व्हावे लागेल. ही समस्या तशी सर्वांपेक्षा सामान्य आहे जी आपणास सहज होऊ शकते. एचपीव्ही व्हायरसचे संक्रमण होण्यासाठी पेनिट्रेशन असणे जरुरी नाही. ही समस्या त्वचेचा त्वचेशी संपर्क आल्यानेही होऊ शकते. या व्हायरसचे काही स्ट्रेन तर सर्व्हायकल कॅन्सर सारखे गंभीर आजारालादेखील कारणीभूत आहेत. 

* मोलस्कम
हा एक व्हायरस आहे जो आपल्या त्वचेवर पुळ्या तयार करतो. हा फारसा गंभीर आजार नाही मात्र या पुळ्यांपासून होणारा त्रास खूप जास्त असतो. या व्हायरसचे संक्रमण होऊन इतरत्रदेखील ही समस्या निर्माण होते. 

* सिफिलिस
ही समस्या सुरुवातीला सामान्य वाटते मात्र भविष्यात ही समस्या रुद्र रुप धारण करते. सुरुवातील त्वचेवर जखमा होतात, मात्र काही कालावधीनंतर ह्रदयाशी संबंधीत गंभीर आजार निर्माण होतो आणि मेंदूलाही मोठ्याप्रमाणात इजा होते. 

Web Title: SEXUAL HEALTH: 'condom' can not save even from 'these' problems of sex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.