​ SEXUAL HEALTH :‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी अंड्याचे असे करा सेवन !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 11:46 AM2017-02-21T11:46:30+5:302017-02-21T17:16:30+5:30

सेक्स पॉवरची वृद्धी करायची असेल तर काही वस्तूंच्या सोबत खाल्ल्याने नक्कीच फायदा होईल. तर चला जाणून घेऊया की, कोणत्याप्रकारे सेवन केल्याने आपणास फायदा होईल.

SEXUAL HEALTH: Eggs Eat to Improve 'Sex Life' | ​ SEXUAL HEALTH :‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी अंड्याचे असे करा सेवन !

​ SEXUAL HEALTH :‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी अंड्याचे असे करा सेवन !

googlenewsNext
ong>-Ravindra More

अंडे खाणे आरोग्यासाठीच फायदेशिर नव्हे तर याच्या सेवनाने कामेच्छादेखील वाढते असे एका संशोधनाद्वारे निष्पन्न झाले आहे. अंड्यातील विटॅमिन बी-५ आणि विटॅमिन बी-६ सेक्स लाइफला सुधारण्यासाठी उपयुक्त मानण्यात आले आहे. 

जर आपणास सेक्स पॉवरची वृद्धी करायची असेल तर काही वस्तूंच्या सोबत खाल्ल्याने नक्कीच फायदा होईल. तर चला जाणून घेऊया की, कोणत्याप्रकारे सेवन केल्याने आपणास फायदा होईल.
 


* सेक्स लाइफला उत्तम बनविण्यासाठी अंड्यांसोबत गाजरचे सेवन करा. गाजरला अर्ध्या उकळलेल्या अंड्यांमध्ये मिक्स करा आणि त्यात मध टाकू न खा. महिन्यातून एकदा किंवा दोनदा याचे सेवन के ल्याने आपणास नक्की फायदा होईल. 

* एका संशोधनातुन जाहीर करण्यात आले आहे की, जे लोक फ्राइड अंडे खाणे पसंत करतात ते लोक सेक्समध्ये अधिक रुची ठेवतात, म्हणजेच त्यांची यौन इच्छा दुसऱ्यापेक्षा तीव्र असते. 

* जर आपणास गाजर खाणे आवडत नसेल तर आपण अद्रकचा वापर करु शकतात. अर्ध्या उकळलेल्या अंड्यात एक चमच अद्रकाचा रस मिक्स करा आणि रोज रात्री झोपण्या अगोदर याचे सेवन करा. लवकरच आपणास याचा परिणाम दिसेल. 

* महिलांसाठी अंड्याचे सेवन खूपच फायदेशिर असते. अंड्यातील फोलिक अ‍ॅसिड आणि विटॅमिन बी-१२ स्तनाच्या कॅन्सरला दूर ठेवते. सोबतच भ्रूण विकसित करण्यातही मदत करते.

* अंड्याच्या सेवनाने मांसपेशी मजबूूत होतात. अंड्यातील ‘ओमेगा ३’ फॅटी अ‍ॅसिड शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल उत्पादित करते. 

Also Read : ​ हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !

Web Title: SEXUAL HEALTH: Eggs Eat to Improve 'Sex Life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.