SEXUAL HEALTH : पुरुषत्व वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ‘अक्रोड’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 11:28 AM2017-03-28T11:28:54+5:302017-03-28T16:58:54+5:30

अक्रोडमध्ये जिंक, पोटॅशियम आणि मॅग्निशियमसारखे तत्त्व असतात ज्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते.

SEXUAL HEALTH: Increasing manhood is useful in reducing weight 'walnut'! | SEXUAL HEALTH : पुरुषत्व वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ‘अक्रोड’ !

SEXUAL HEALTH : पुरुषत्व वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ‘अक्रोड’ !

googlenewsNext
्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन्स, फायबर आणि अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते. म्हणून अक्रोड फक्त शरीरात पोषक तत्त्वांचीच कमतरता पुर्ण करीत नाही तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. 
अक्रोडमधील पोषक तत्त्वांमुळे ब्लड प्रेशर, स्ट्रोक, पोटाचा कॅन्सरसारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. 
जर झोप न येण्याची समस्या असेल तर अक्रोडचे सेवन करावे. यात मेलाटोनिन नावाचे तत्त्व असते जे झोप येण्यासाठी साहायक आहे. अक्रोड शिवाय अन्य सुकामेवांमुळे वजन वाढते मात्र हे वजन कमी करण्यास मदत करते. यात मोनोअनसैटुरेटेड फैटी एसिड, ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते जे शरीराच्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करते आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. याकारणाने ह्रदयाच्या समस्याही दूर होतात. शिवाय अक्रोडमधील अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट्स, विटॅमिन्समुळे शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. सोबत रोज अक्रोड खाल्लयाने थकवा दूर होण्यास मदत होते. 
अक्रोडमध्ये जिंक, पोटॅशियम आणि मॅग्निशियमसारखे तत्त्व असतात ज्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते. यामध्ये फोलेटदेखील असते ज्याने फर्टीलिटी वाढते. 
अक्रोड खाल्लयाने मेंदूची क्रियाशिलता वाढते यामुळे याला ब्रेन फूडच्या नावानेदेखील ओळखले जाते. यात विटॅमिन ई असल्याने मेंदूला सक्रिय आणि सुदृढ बनविते. 

Also Read : ​​ अक्रोड खा अन् टेन्शन पळवा!

Web Title: SEXUAL HEALTH: Increasing manhood is useful in reducing weight 'walnut'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.