SEXUAL HEALTH : ‘ओरल सेक्स’ने होतो मेंदू व घशाचा कॅन्सर !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2017 07:05 AM2017-03-18T07:05:19+5:302017-03-18T12:35:19+5:30

आत्तापर्यंत फक्त धुम्रपान आणि मद्यपानामुळेच मेंदूचा तसेच घश्याचा कॅन्सर होत असल्याचा समज होता. मात्र कोणतेही व्यसन न करणाऱ्यामध्येही या कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे.

Sexual health: 'oral sex' is the brain and pharyngeal cancer! | SEXUAL HEALTH : ‘ओरल सेक्स’ने होतो मेंदू व घशाचा कॅन्सर !

SEXUAL HEALTH : ‘ओरल सेक्स’ने होतो मेंदू व घशाचा कॅन्सर !

googlenewsNext
डनमधील एका महाविद्यालयाने केलेल्या संशोधनातून ‘ओरल सेक्स’ केल्याने मेंदू आणि घशाचा कॅ न्सर होऊ शकतो, असे समोर आले आहे. हे संशोधन ‘द अलबर्ट आईन्स्टाइन कॉलेज आॅफ मेडिकल रिचर्स’ या महाविद्यालयात करण्यात आले. 
या अभ्यासानुसार, ओरल सेक्समुळे ह्युमन पापिलोमाव्हायरस (एचपीव्ही) या विषाणुंचा शरिरामध्ये प्रसार होतो त्यामुळे मेंदूच्या तसेच घशाच्या कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे नमूद केले आहे. आत्तापर्यंत फक्त धुम्रपान आणि मद्यपानामुळेच मेंदूचा तसेच घश्याचा कॅन्सर होत असल्याचा समज होता. मात्र कोणतेही व्यसन न करणाऱ्यामध्येही या कॅन्सरचे प्रमाण वाढू लागल्याने डॉक्टरांनी हा कॅन्सर होण्यामागे इतर कोणती कारणे आहेत, याचा शोध घेण्याच्या दृष्टीने हे संशोधन केले होते. 
दोन टप्प्यात केलेल्या या अभ्यासामध्ये ९७ हजार लोकांचे चार वर्ष निरीक्षण करण्यात आले. अधिक ओरल सेक्स करणाऱ्या १३२ लोकांना घशाचा किंवा मेंदूचा कॅन्सर झाल्याचं या अभ्यासात दिसून आले. ओरल सेक्स शिवाय माऊथ वॉशमधूनही या विषाणुंचा संसर्ग होऊ शकतो. या विषाणुंवर लसीच्या माध्यमातून नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे, असेही संशोधनानंतर आढळून आले.

Web Title: Sexual health: 'oral sex' is the brain and pharyngeal cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.