Sexual Health : ‘सेक्सरसाईज’ करा अन् व्हा स्लिम आणि फिट !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 07:57 AM2017-05-23T07:57:03+5:302017-05-23T13:27:03+5:30

'सेक्स्झरसाईज' म्हणजे 'सेक्स' आणि 'फिटनेस' यांची सागड. 'सेक्स्झरसाईज' हा स्लिम होण्याचा नवा मंत्र आहे. तुम्ही पुरेसा सेक्स केलात की सडपातळ झालात म्हणून समजा.

Sexual Health: 'Sensorize' and get slim and fit! | Sexual Health : ‘सेक्सरसाईज’ करा अन् व्हा स्लिम आणि फिट !

Sexual Health : ‘सेक्सरसाईज’ करा अन् व्हा स्लिम आणि फिट !

Next
ong>-Ravindra More
बदलती जीवनशैली त्यातच आहाराबाबत निष्काळजीपणा यामुळे लठ्ठपणा ही मोठी समस्या बहुतेकजणांना भेडसावत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी डायट, चालणे, घाम निघेपर्यंत व्यायाम करणे आदी प्रयत्न केले जातात. मात्र एका नव्या संशोधनानुसार व्यायाम आणि डाएटमधून जे साध्य होणार नाही ते या 'सेक्स्झरसाईज'ने साध्य होईल. अहो, हे डॉक्टरांनीच सांगितलंय. 

'सेक्स्झरसाईज' म्हणजे 'सेक्स' आणि 'फिटनेस' यांची सागड. 'सेक्स्झरसाईज' हा स्लिम होण्याचा नवा मंत्र आहे. तुम्ही पुरेसा सेक्स केलात की सडपातळ झालात म्हणून समजा. व्यायामाने काय साध्य होत? रक्तप्रवाह सुधारतो. ह्रदय मजबूत होतं. कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. धोकादायक कोलॅस्टरॉल (एलडिएल) चांगल्या कोलॅस्टरॉलमध्ये (एचडीएल) परिवर्तित होतं. वजन नियंत्रणात येतं आणि झोपही छान लागते. शिवाय शरीरात नव्या उजेर्चा संचारही होते. त्यामुळे आयुष्यरेषा चांगलीच लांबते. मग हे सारं 'सेक्स्झरसाईज' नेही साध्य करता येतं. 
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या सेक्शुअल फिटनेसकडे महिला मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. कारण त्यातून मोठ्या प्रमाणात एस्ट्रोजेन हे हार्मोन स्त्रवते. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. पुरूष आणि महिलांसाठीही हा 'व्यायाम' फायदेशीर आहे. कारण यामुळे कांती तुकतुकीत होते. कारण या 'सेक्स्झरसाईज' मधून घाम मोठ्या प्रमाणात स्त्रवतो. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते आणि तुम्ही आकर्षक दिसू लागता. 

'सेक्स्झरसाईज' ही कल्पना सेक्स एज्युकेटर डॉ. युवान क्रिस्टिन फुलब्राईट यांच्या डोक्यातून दीर्घ अनुभवाने साकारली आहे. अर्थात, डॉ. फुलब्राईट यांच्या मते, हा 'सेक्स्झरसाईज' करण्यापूर्वी काही तयारीही लागते. अर्थात, त्यासाठी तुमचे शरीर तुम्हाला तयार करायला हवे. कारण सेक्स हाही एक व्यायामच आहे आणि तिथे 'स्टॅमिना' चांगला लागतो. त्यासाठी आधी स्वतंत्र व्यायामातून तो कमवावाही लागतो. पण त्यानंतर तुम्ही नियमितपणे सेक्स करू लागलात की इतर व्यायामातून तुम्हाला जे काही मिळतं, तेवढं किंवा त्याहूनही अधिक सेक्समधून मिळतं.  

तीस मिनिटांच्या सेक्समुळे १५ ते ३५० कॅलरी जळू शकतात. अर्थात यात तुम्ही किती काळ रत राहू शकता, म्हणजे तुमचा स्टॅमिना किती यावर किती कॅलरी जळणार हे अवलंबून आहे. अर्धा तास चालण्यातून, धावण्यातून किंवा वजन उचलण्यातून जेवढ्या कॅलरी जाळतात, तेवढ्याच कॅलरी या अर्धा तास सेक्समधून जळतात. आणि हो, त्यातही तुम्ही आठवड्यातून पाच पेक्षा अधिक वेळा आणि तीस मिनिटांपेक्षा जास्त काळ सेक्स करू शकलात तर जवळपास १ हजार ६५० हून अधिक कॅलरी जाळू शकता. त्यातही सेक्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जोडीदाराच्या कॅलरीज जास्त जळतात. 'सेक्स्झरसाईज' चा हा परिणाम व्यायामातूनही साधायचा नाही. 

या 'सेक्स्झरसाईज' वरून आपले ध्येय चुकवू नका. त्यावरून ढळू नका. आपोआपच सेक्सचा आनंद घेता घेता तुम्हाला त्याचे परिणामही तुमच्या शरीरावर दिसू लागतील. शारीरिक तंदुरूस्ती वाढू लागेल. तुमचे पोट, पाठ, पार्श्वभाग, पाय आणि बाहू मजबूत होतील. 
आणि हो, 'सेक्स्झरसाईज' करताना तेही 'रूटीन' होऊ देऊ नका. नाही तर रोज फिरायला जाता तसाच सेक्सही कराल. त्याचा मजाही घ्या आणि द्याही. कृती तीच असली तरी ती करण्याच्या प्रकारात वैविध्य आणा. त्यामुळे त्यात काही सृजनात्मक केल्यासारखे वाटेल आणि त्याचा मजा वाढेल. 

महत्त्वाचे म्हणजे एवढा 'सेक्स्झरसाईज' केल्यानंतर दमायलाही होईल. त्यामुळे त्यानंतर आहाराचीही काळजी घ्या. पोषक आहार घ्या. जोडीदाराचीही तशीच काळजी घ्या. आणखी एक. चांगल्या व्यायामानंतर तुम्ही घामाघूम व्हाल. यानंतर मग छानपैकी शॉवरबाथ घ्या. जोडीदारासह घेतल्यास त्याचा मजा काही औरच असेल काय?  
Source : webdunia

Web Title: Sexual Health: 'Sensorize' and get slim and fit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.