Sexual Health : ‘सेक्स सुपरबग’, एड्सपेक्षाही महाभयंकर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 11:38 AM2017-04-04T11:38:59+5:302017-04-04T17:34:42+5:30

आतापर्यंत आपण एचआयव्ही-एड्सच्या बाबतीत ऐकले असेलच, मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार एड्सपेक्षाही महाभयंकर आजार ‘सेक्स सुपरबग’ आहे.

Sexual Health: 'Sex superbug', more serious than AIDS! | Sexual Health : ‘सेक्स सुपरबग’, एड्सपेक्षाही महाभयंकर आजार !

Sexual Health : ‘सेक्स सुपरबग’, एड्सपेक्षाही महाभयंकर आजार !

Next
ong>-Ravindra More
आतापर्यंत आपण एचआयव्ही-एड्सच्या बाबतीत ऐकले असेलच, मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार एड्सपेक्षाही महाभयंकर आजार ‘सेक्स सुपरबग’ आहे. संशोधनात एक नवा प्राणघातक व्हायरस आढळून आला आहे, ज्यामुळे जगभरात एकच खळबळ माजली आहे.

सुपरबगचा प्रभाव
सुपरबगचे बॅक्टेरिया एड्सच्या व्हायरसपेक्षा अधिक वेगाने पसरतात आणि लवकरच शरीरावर परिणाम दिसून येतात. एवढेच नव्हे तर एचआयव्हीने संक्रमित व्यक्तीचे शरीर कमकुवत होण्यास वेळ लागतो, त्यापेक्षा सुपरबगचा प्रभाव यापेक्षाही अधिक घातक होऊ  शकतात. डॉक्टर्सचे हे देखील म्हणणे आहे की, सुपरबग व्हायरसने ‘सेप्टिक शॉक’देखील होऊ शकतो, ज्याने पीडित व्यक्तीचा काही दिवसातच मृत्यु होऊ शकतो. 

सर्व प्रथम जापानमध्ये
सुरक्षित सेक्स केल्यानेच ‘सुपरबग’ व्हायरसपासून बचाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘सेक्स सुपरबग’ला ‘गोनोरिया’ किंवा ‘एचओ४१’ नावानेही ओळखले जाते. ‘सेक्स सुपरबग’च्या व्हायरसच्या बाबतीत सर्वप्रथम जापानमध्ये २०११ साली माहित झाले. एका सेक्स वर्करमध्ये ‘एचओ४१’चे लक्षण आढळले होते. जापानपासून पसरत हा व्हायरस हवाई, कॅलीफोर्निया आणि नॉर्वेपर्यंत पोहचला आहे. 

Web Title: Sexual Health: 'Sex superbug', more serious than AIDS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.