SEXUAL HEALTH : ​...म्हणून नैराश्यात करावा सेक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2017 05:57 AM2017-04-18T05:57:19+5:302017-04-18T11:32:52+5:30

नैराश्य, ताणतणाव आदी समस्यांनी त्रस्त असल तर का करावा सेक्स, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी...

SEXUAL HEALTH: ... so be disappointed in sex! | SEXUAL HEALTH : ​...म्हणून नैराश्यात करावा सेक्स!

SEXUAL HEALTH : ​...म्हणून नैराश्यात करावा सेक्स!

googlenewsNext
ong>-Ravindra More
आज प्रत्येक  मनुष्याचे जीवन धावपळीचे व धकाकीचे झाले आहे. त्यातच कामाचा व्याप, जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे जडलेले व्यसन, शारीरिक व्याधी आदी कारणांनी आलेले नैराश्य. ज्या व्यक्तींचे आयुष्य नैराश्येने ग्रासले आहे, त्यांचे जीवन जणू निरस झाल्यासारखे असते. मात्र एका संशोधनानुसार, वैवाहिक जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि आपल्यात आलेले नैराश्य दूर करण्यासाठी रोज सेक्स करणे तितकेच महत्वाचे आहे असे सांगण्यात आले आहे 
जीवनात अनेक चढ उतार येत असतात. काहीवेळा कठीण समस्यांमुळे आलेला दबाव किंवा एखादी भिती अशा समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर त्यावर सेक्स हा चांगाला उपाय ठरू शकतो. जरा हे विचित्र वाटते. मात्र, यामागे शास्त्रीय कारणे आहेत. 
त्यात असे म्हटले आहे की, आपले मानसिक  आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी आयुष्यात सेक्सचा मोठा हातभार असतो. आणि हे या अगोदर केलेल्या अभ्यासातूनही स्पष्ट झाले आहे.
सेक्स करताना आपल्या शरीरात डोपामिन नावाचे द्रव तयार होते. जे नैराश्य दूर करणाऱ्या हार्मोनचा प्रतिकार करते.
शिवाय सेक्सच्यावेळी तुमच्या शरीराची हालचाल ही व्यायामाप्रमाणे असते. यावेळी श्वासोश्वासचा वेग वाढतो. त्यामुळे पेशींमधील आॅक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यानंतर थकवा जाणवतो. म्हणजेच तुमच्या कॅलरीज बर्न होतात. आठवड्यातून तीन वेळा सेक्स केला तर मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. 
तसेच मिठी मारणे किंवा सेक्स केल्याने बीपी कमी होऊ शकतो, असा अभ्यासाअंती शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला, ताप वरचेवर येत असेल तर सेक्स हा त्यावरील चांगला उपाय आहे. आठवड्यातून तीन वेळा सेक्स केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसू शकतो. तस सेक्स केल्याने कॅलरिज बर्न झाल्याने हृदय निरोगी राहते. अटॅकचा धोका कमी राहतो.

Also Read : SEXUAL HEALTH : हॅपी ‘सेक्स लाईफ’साठी अनोखे फंडे !
                     SEXUAL HEALTH : संपूर्ण शारीरिक सुखासाठी खा ‘हे’ सुपरफूड !
   

Web Title: SEXUAL HEALTH: ... so be disappointed in sex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.