SEXUAL HEALTH : ...तो परमोच्च आनंद घेण्याअगोदर या ‘१० गोष्टी’ अतिमहत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2017 06:41 AM2017-04-18T06:41:19+5:302017-04-18T12:11:19+5:30

या आनंदाच्या क्षणी त्या चुका होऊ नयेत यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.

SEXUAL HEALTH: ... these '10 things' before the supreme bliss! | SEXUAL HEALTH : ...तो परमोच्च आनंद घेण्याअगोदर या ‘१० गोष्टी’ अतिमहत्त्वाच्या !

SEXUAL HEALTH : ...तो परमोच्च आनंद घेण्याअगोदर या ‘१० गोष्टी’ अतिमहत्त्वाच्या !

Next
ong>-Ravindra More
सुखी वैवाहिक जीवनासाठी सेक्स हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र बऱ्याचदा काही गोष्टींमुळे या दरम्यानच्या आंनदावर पाणी फिरते आणि तुमचा पार्टनर निराश होतो. कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे या आनंदाच्या क्षणी त्या चुका होऊ नयेत यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.

१. रात्री बऱ्याचदा घाई केली जाते. मात्र अति घाईचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी सेक्स करण्याच्या 3 तास आधी अन्न आणि पाणी घेऊ नये. त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

२. नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते. यामुळे बेडरुममध्ये थकवा येणार नाही, नाहीतर तुमचा पार्टनर निराश होऊ शकतो.

३. सेक्स करण्याआधी 3 तास आधी मनुका आणि अक्रोडाचे सेवन करावे.

४. मेडिटेशननेही मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. यासाठी किमान रोज १० मिनिटे मेडिटेशन करावे.

५. सेक्स दरम्यान जास्त घाई करु  नये. तुमच्या पार्टनरच्या संमतीने काही वेळ थांबावे.

६. आधी काही वेळ सोबत घालवा. रोमॅँटिक गप्पांनी सुरुवात करावी.  

७. सेक्स दरम्यान कुठलाही विचार करू नये. शिवाय भय आणि चिंता तर करू नये.

८. सेक्स करण्याअगोदर कांदा, लसून आदींचे सेवन टाळावे, कारण यामुळे शरीरातून दुर्गंध निर्माण होऊ शकतो.

९. सेक्स आधी अंघोळ आणि ब्रश केल्यास उत्तम.

१०. सेक्सदरम्यान फोनवर बोलणे, मॅसेज करणे यासारख्या गोष्टी टाळा. तुमच्या पार्टनरला एकटं सोडून जाऊ नका.

Also Read : ​Sexual Health : तो आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘या’ ९ गोष्टींचे भान ठेवा !
 

Web Title: SEXUAL HEALTH: ... these '10 things' before the supreme bliss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.