SEXUAL HEALTH : ‘सेक्स लाइफ’ला अडथळा ठरणारे हे आहेत ‘सहा’ आजार !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 12:58 PM2017-03-23T12:58:14+5:302017-03-23T18:28:14+5:30
काही शारीरिक आजार आपल्या ‘सेक्स लाइफ’ला अडथळा ठरतात आणि त्यामुळे आपल्या जीवनाचा आनंद हिरावला जातो. यामुळे आरोग्यदायी व आनंददायक सेक्सचा अनुभव घेण्यासाठी या ‘सहा’ शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करु नये.
आयुष्याचा परिपूर्ण आनंद घेत असताना त्यात ‘सेक्शुअल’ आनंदही खूप महत्त्वाचा आहे. मात्र काही शारीरिक आजार आपल्या ‘सेक्स लाइफ’ला अडथळा ठरतात आणि त्यामुळे आपल्या जीवनाचा आनंद हिरावला जातो. यामुळे आरोग्यदायी व आनंददायक सेक्सचा अनुभव घेण्यासाठी या ‘सहा’ शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करु नये.
कंबरदुखी : बदलत्या जीवनशैलीमुळे कंबरदुखीचा त्रास बहुतेकजणांना सतावत आहे. कंबरदुखीमुळे सेक्स लाईफवर परिणाम होत नसला तरीही हा सेक्स लाईफमधील एक अडथळा ठरू शकतो. पाठीच्या कण्याचे दुखणे व विकार यामुळे सेक्स करण्यास त्रास होऊ शकतो. एका अभ्यासानुसार असे सामोरी आले आहे की, ६१ टक्के लोकांनी पाठीच्या दुखण्यामुळे सेक्स करणे टाळले आहे. जर तुम्हाला सौम्य स्वरुपातील पाठीचे दुखणे असेल तर वेळीच योग्य व्यायामाने त्यावर मात करा.
अॅनमिया : अॅनिमियाचा तसा तुमच्या सेक्स लाईफवर थेट परिणाम होत नाही, मात्र यामुळे तुम्हाला थकवा किंवा सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते. विशेषत : पुरुषांमध्ये अॅनिमियामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होते. मात्र जीवनशैलीतील काही बदलांमुळे या समस्येवर उपाय करणे शक्य आहे.
मोनोपॉज: मोनोपॉजच्या काळात स्त्रीयांच्या शरीरात होणार्या हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांमधील सेक्स करण्याची इच्छा कमी होते. या ट्प्प्यात स्त्रीयांची सेक्सलाईफ मधील रुची, पुनरावृत्ती व वेदना तुलनेत कमी होतात. मात्र योग्य समुपदेशनाने आरोग्यदायी सेक्स लाईफ परत मिळवणे शक्य आहे.
रक्तवाहिन्यांचे विकार : पुरुषांमध्ये शिश्नाच्या ताठरतेवर त्यांचे लैंगिक सुख अवलंबून असते. मात्र जननेद्रियांना रक्त पुरवठा करणार्याश वाहिन्यांमध्येच काही बिघाड झाल्यास त्याचा परिणाम सेक्स लाईफवर होतो.
नैराश्य : तुमच्या मेंदुतून सेक्सबद्दलची भावना निर्माण न झाल्यास तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही. जर मेंदूतून संकेत देण्याची प्रकिया मंदावली तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही ताण, भीती किंवा नैराश्याने पिडित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्सलाईफवर देखील होतो.
मधुमेह: रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण सेक्स लाईफमध्ये अनेक अडथळे निर्माण करू शकते. ६० ते ७० मधुमेही पुरुष, या विकारामुळे शिश्नाची ताठरता राखू शकत नाहीत. मधुमेहामुळे शिश्नाला होणारा रक्तपुरवठा बाधित होतो. परिणामी शिश्नाला संतुलित करणार्याई नसींना योग्य संकेत न मिळाल्याने ताठरता राखता येत नाही.