SEXUAL HEALTH : ​वैवाहिक आयुष्यात ‘बेडरुम’ मॅनर्स हवाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 07:13 AM2017-02-17T07:13:48+5:302017-02-17T12:47:54+5:30

सेक्स केल्यानंतर आपल्या पार्टनरशी गप्पा नक्की माराव्यात. संशोधनानुसार, सेक्स केल्यानंतर गप्पा मारल्याने पार्टनर जास्त आनंदी होतो.

SEXUAL HEALTH: Wanted 'bedroom' manners in marital life! | SEXUAL HEALTH : ​वैवाहिक आयुष्यात ‘बेडरुम’ मॅनर्स हवाच !

SEXUAL HEALTH : ​वैवाहिक आयुष्यात ‘बेडरुम’ मॅनर्स हवाच !

Next
ong>-Ravindra More

पती-पत्नीचे नाते जगातील सर्वात वेगळे नाते आहे. मात्र या नात्यातीत आनंद कमी होऊ नये म्हणून काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. आज आम्ही आपणास असेच काही नियम सांगत आहोत ज्यांचे पालन केल्याने नक्कीच आपले नाते अधिक घट्ट होईल. 

प्रत्येक महिलेला स्वत:ची प्रशंसा ऐकायला मनापासून आवडते. यामुळे त्यांची प्रशंसा आवर्जून करा. वेळोवेळी त्यांना जाणीव करुन द्या की, त्यांच्या आगमनाने तुमचे आयुष्य अधिक सुखमय झाले. 

या नात्यात सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे आपल्या पार्टनरचा विश्वास संपादन करणे. जो पर्यंत आपल्या पार्टनरचा आपण पूर्णत: विश्वास जिंकत नाही तोपर्यंत ती तुमच्याशी सर्व गोष्टी शेअर करुच शकत नाही. आणि हो एकदा विश्वास जिंकल्यानंतर तो मात्र कायम ठेवावा. 

जेव्हा आपण आपल्या पार्टनरच्या सोबत असाल तेव्हा आपला फोन वेळोवेळी चेक करु नका. यामुळे आपल्या पार्टनरला वाटेल की, आपण त्याची काळजी करत नाही. 

आपण कितीही व्यस्त असाल मात्र आपल्या पार्टनरशी गप्पा मारणे अजिबात बंद करु नका. गप्पा मारता मारता आपण आपल्या पार्टनरच्या मनातील विचार ओळखू शकतो. आणि हो सेक्स केल्यानंतर आपल्या पार्टनरशी गप्पा नक्की माराव्यात. संशोधनानुसार, सेक्स केल्यानंतर गप्पा मारल्याने पार्टनर जास्त आनंदी होतो. 

जर आपली पार्टनर किचनमध्ये काम करत असेल तर तिला नक्की मदत करा. शक्य तेवढा जास्त वेळ द्या. महिन्यातुन एकदातरी बाहेर फिरायला जा. यामुळे आपली पार्टनर आनंदी होईल आणि आपले वैवाहिक आयुष्य अधिक प्रगाढ बनेल. 

Also Read : ​सुखी वैवाहिक जीवनासाठी द्या बेडरुमला ‘लाल रंग’
  

Web Title: SEXUAL HEALTH: Wanted 'bedroom' manners in marital life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.