लाजणारं लाजाळूचं झाड दिसतं लहान पण फायदे आहेत चकीत करणारे, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:27 PM2022-07-06T21:27:03+5:302022-07-06T21:30:01+5:30

लाजाळुची पाने नैसर्गिक उपचारांसाठी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होताना (Lajvanti Health Benefits) दिसत नाहीत.

shameplant or lajavanti leaves are extremely beneficial for health know the benefits | लाजणारं लाजाळूचं झाड दिसतं लहान पण फायदे आहेत चकीत करणारे, वाचा सविस्तर

लाजणारं लाजाळूचं झाड दिसतं लहान पण फायदे आहेत चकीत करणारे, वाचा सविस्तर

googlenewsNext

मिमोसा पुडिका असे वैज्ञानिक नाव असलेली लाजाळू वनस्पती आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. इंग्रजीत त्याला 'नॉट प्लांट इन टच' म्हणतात. त्याच्या पानांपासून बियांपर्यंत सर्व भाग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाजाळुची पाने नैसर्गिक उपचारांसाठी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होताना (Lajvanti Health Benefits) दिसत नाहीत.

ही वनस्पती त्याच्या लाजाळू वर्तनासाठी प्रसिद्ध आहे. लाजाळू वनस्पतीला स्पर्श केल्यावर पाने आपोआप मिटली जातात आणि काही काळासाठी ही वनस्पती कोमेजल्यासारखी दिसते. यामुळेच याला मिमोसा वनस्पती असेही म्हणतात. जर एखादी व्यक्ती मानसिक तणाव, चिंता किंवा मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त असेल तर त्याला या वनस्पतीच्या पानांचा खूप फायदा होतो. जाणून घेऊया लाजाळू वनस्पती विविध शारीरिक समस्यांवर कशी फायदेशीर ठरते.

लाजाळू वनस्पतीचे फायदे -
-Wildturmeric.net मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, लाजाळुच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. दिवसातून दोन ते तीन वेळा याच्या पानांचे सेवन केल्याने मधुमेहींना खूप फायदा होतो.

- अंगावर जखमा झाल्या असतील किंवा काही कारणाने पुरळ उठले असेल तर लाजाळुच्या पानांची पेस्ट बनवून दुखापतीवर लावल्यास ती बरी होते.

- तणाव कमी करण्यासाठीदेखील लाजाळू फायदेशीर मानले जाते. यासोबतच मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही लाजाळू फायदेशीर आहे, त्यामुळे नैराश्य आणि तणाव दूर करण्यासाठी लाजाळुच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो.

-यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे श्वसनाशी संबंधित आजार बरे करण्यास मदत करतात.

-आयुर्वेदानुसार पती-पत्नीमधील संबंध सुधारण्यासही मदत होते.

-अतिसार, अल्सर आणि पोटाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यासाठीही लाजाळूच्या पानांचा उपयोग होतो.

Web Title: shameplant or lajavanti leaves are extremely beneficial for health know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.