SHOCKING : दूर राहूनही करता येईल ‘सेक्स’, तेही ‘या’ अॅपच्या साह्याने!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2017 01:06 PM2017-03-30T13:06:34+5:302017-03-30T18:36:34+5:30
दूर राहून प्रेम करणाऱ्यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान व उत्पादने एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
Next
दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होताना दिसत आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने आज प्रत्येकाचे आयुष्य सुखी होत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मनुष्याला आज जीवन जगायला बऱ्याच मुलभूत गरजांची आवश्यकता असते. त्या गरजा तंत्रज्ञानाद्वारे सोप्या पद्धतीने आपणास सहज उपलब्ध होताना दिसत आहे, त्यातील मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ‘सेक्स’.
मात्र बऱ्याचजणांना नोकरी अथवा कामानिमित्त लॉँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहावे लागते. यांच्यासाठी मात्र सेक्सची समस्या ही कायमची आहे. मात्र सेक्स टॉईजचा वाढता वापर पाहता अशा जोडीदारांना हे टॉईज काहीअंशी फायदेशिर ठरत आहेत.
विशेष म्हणजे या सेक्स टॉईजला तंत्रज्ञानाची जोड देत त्यात नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे. एका सेक्स टॉईज कंपनीचे मॅनेजर पॉल जॅक्स यांनी सांगितले की, आता असे सेक्स टॉईज बाजारात आले आहेत ज्यांना मोबाइलद्वारे नियंत्रित करता येते. यासाठी मोबाईलमध्ये विशेष अॅप डाउनलोड करावे लागेल.
या अॅपच्या मदतीने लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये राहणारे जोडीदार आपल्या सेक्स लाईफचा आनंद घेऊ शकतात. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे जोडीदार या अॅपच्या मदतीने कनेक्ट होऊन एकमेकांचे सेक्स टॉईज कंट्रोल करू शकतात.
दुसºया एका देशात बसलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या सेक्स टॉईजना नियंत्रित करू शकते. यामध्ये असलेल्या मिनिमाईझ पयार्याचा वापर करून त्याच वेळी व्हिडीओ कॉलही करता येतो.
बाजारात सध्या ब्लूटूथने नियंत्रित होणारे टॉईजही चांगले असून त्यांना रिमोटने नियंत्रित करता येते.
दूर राहून प्रेम करणाऱ्यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान व उत्पादने एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.