श्वास घेताना धाप लागतेय? असू शकतात गंभीर आजारांची लक्षणे, टाळण्यासाठी हे उपाय त्वरित करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:10 PM2021-06-10T20:10:26+5:302021-06-10T20:10:26+5:30

वास्तविक, धाप लागणे हा एक आजार नाही. मात्र, हे निश्चितपणे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते...

Shortness of breath? There may be symptoms of serious illness, take these measures immediately to prevent ... | श्वास घेताना धाप लागतेय? असू शकतात गंभीर आजारांची लक्षणे, टाळण्यासाठी हे उपाय त्वरित करा...

श्वास घेताना धाप लागतेय? असू शकतात गंभीर आजारांची लक्षणे, टाळण्यासाठी हे उपाय त्वरित करा...

googlenewsNext

एका मिनिटाच्या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त वेळा श्वास घेण्याच्या अवस्थेस धाप लागणे किंवा श्वास लागणे, असे म्हटले जाते. वेगाने श्वास घेण्याच्या या प्रक्रियेस इंग्रजीमध्ये ‘हायपरवेन्टिलेशन’ म्हणतात. हार्ट फेल्युअर, फुफ्फुसाचा संसर्ग, गुदमरल्यासारखे वाटणे इत्यादी अवस्थेत, त्या व्यक्तीला डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू लागते. वास्तविक, धाप लागणे हा एक आजार नाही. मात्र, हे निश्चितपणे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते...


हे उपाय करून बघाच -

ब्लॅक कॉफी प्या:

श्वासासंबंधित काही समस्या जाणवत असेल तर कॉफी पिणे तुमच्यासाठी खूपच लाभदायी ठरू शकते. कॉफी मध्ये कैफिन असते जे आपल्या मस्तिष्काला उत्तेजित करत असते. याव्यतिरिक्त कॉफी आपल्या मसल ला रिलॅक्स देखील करत असते. श्वासासंबंधिच्या समस्या ह्या श्वासनलिकेत येणाऱ्या सुजेमुळे देखील होत असते.

आल्याचा चहा करून पिणे:
आल्याचा चहामध्ये एंटी-इम्प्लिमेंट्री, एंटी-व्हायरल आणि एंटी-बॅक्टेरीयल गुण असतात, ह्या चहाचे सेवन केल्यास तुमच्या श्वासनलिकेची सूज कमी होण्यास मदत होते. तसेच गळ्यामध्ये साचलेले सर्व कप पघळून बाहेर निघून जात असतो. यामुळे सर्दी खोकला पडसे इत्यादी आजारांवर अद्रकचा चहा खूपच उपायकारी ठरू शकतो. श्वासा संबंधित काही समस्या असल्यास तर तुम्हाला अद्रक चा चहा नक्की प्यायला हवा.

जमिनीवर झोपून मोठा श्वास घ्या:
जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की आपला श्वास उखडण्याच्या मार्गावर आहे तेव्हा तुम्ही जेथे असाल तेथे लगेच जमिनीवर आडवे व्हा, आपला हात पोटावर ठेवा आणि जोरात श्वासोच्छ्वास घ्या.

श्वास घेतांना नाकाद्वारे इतक्या जास्त प्रमाणात श्वास घ्या की जेणेकरून तुमचे पोट हे मोठ्या प्रमाणात फुगेल. घेतलेला श्वास काही सेकंदासाठी तसाच ठेवा आणि नंतर आपल्या तोंडाद्वारे हा श्वास अगदी हळू हळू सोडा. हा उपाय बराच वेळ केल्यास तुम्हाला नक्की चांगले वाटेल.


 

Web Title: Shortness of breath? There may be symptoms of serious illness, take these measures immediately to prevent ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.