मासिक पाळीमध्ये वर्कआउट करताय?; थोडं थांबा आधी 'हे' वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 03:49 PM2019-09-20T15:49:49+5:302019-09-20T16:02:30+5:30

वर्कआउट हेल्दी अन् फिट राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. धावपळीच्या आयुष्यात स्वतःला फिट ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस वर्कआउट करणं गरजेचं असतं. पण महिलांना प्रत्येकवेळी हे रूटिन फॉलो करायला जमेलच असं नाही.

Should one do workouts during periods | मासिक पाळीमध्ये वर्कआउट करताय?; थोडं थांबा आधी 'हे' वाचा

मासिक पाळीमध्ये वर्कआउट करताय?; थोडं थांबा आधी 'हे' वाचा

Next

(Image Credit : Building Muscle 101)

वर्कआउट हेल्दी अन् फिट राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. धावपळीच्या आयुष्यात स्वतःला फिट ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस वर्कआउट करणं गरजेचं असतं. पण महिलांना प्रत्येकवेळी हे रूटिन फॉलो करायला जमेलच असं नाही. खासकरून मासिक पाळीदरम्यान काही महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांमध्ये अनेक महिलांसमोर असणारा प्रश्न म्हणजे, या दिवसांमध्ये वर्कआउट करावं की नाही? 

शरीरात अनेक बदल घडून येतात

मासिक पाळी दरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. हे त्यांच्या प्रजनन क्षमतेशी निगडीत प्रक्रिया असते. त्यामुळे स्वाभाविकच यादरम्यान शरीराच्या आतमध्ये अनेक बदल होतात. याच पाच दिवसांमध्ये त्यांचं शरीर आणि मन दोन्हींमध्ये फार परिवर्तन दिसून येतं. काही महिलांना या दिवसांमध्ये हार्मोन चेंजेसमुळे मूड स्विंग्सचाही सामना करावा लागतो. 

वेदनांमुळेही होतो त्रास 

मासिक पाळीदरम्यान पोट आणि ओटी पोटामध्ये वेदना होतात. त्यामुळे अनेकदा हैराण व्हायला होतं. एवढचं नाहीतर यामुळे काहीही करणं अगदी अवधड होऊन जातं. काही महिलांना तर मासिक पाळी सुरू होण्याआधीपासूनच पिरियड क्रॅम्स यायला सुरू होतात. यामध्ये पोट, पाठही दुखते. या दिवसांमध्ये अॅसिडिटीही वाढते. 

हेव्ही वर्कआउटपासून दूर राहा 

जर तुम्ही मासिक पाळीच्या वेदनांनी हैराण आहात तर जास्त हेव्ही वर्कआउट करू नका. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मासिक पाळीमध्ये होणारा त्रास दूर होईपर्यंत वर्कआउट करणं टाळलं तरिही चालेल. तसेच या दिवसांमध्ये डाएटची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 

करू शकता प्राणायाम आणि ध्यान 

प्राणायाम आणि ध्यान दोन्ही अशा क्रिया आहेत. ज्या करण्यासाठी शरीराला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच यामुळे मनाला शांती मिळण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर मासिक पाळीमध्ये प्राणायाम आणि ध्यान करू शकता. त्यामुळे मूड स्विंग्सपासून तुमची सुटका होण्यास मदत होईल.
 
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Should one do workouts during periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.